Goa Vaccination :18 ते 44 वयोगटातील लसीकरणाचा दुसरा टप्‍पा सुरू

Goa Vaccine The second phase of vaccination for 18 to 44 year old starts from today
Goa Vaccine The second phase of vaccination for 18 to 44 year old starts from today

पणजी: गोवा सरकारतर्फे(Goa government) 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा(Covid-19 vaccine) दुसरा टप्पा उद्यापासून खुला होणार आहे.  आजपासून दुपारी  12 वाजता खुला होणार आहे. त्यानंतर पुढील चार दिवस कोविड व आरोग्य सेतू(AROGAY SETU) या पोर्टलवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी(VACCINATION) नोंदणी करणे गरजेचे आहे. 21 मे पर्यंत ही नोंदणी खुली राहणार आहे. त्‍याचबरोबरच 19 मे रोजी म्हणजेच उद्यपासून लसीकरणही सुरू होणार असल्याचे आरोग्य खात्याच्या लसीकरण उपक्रमाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर(Dr. Rajendra Borkar) यांनी सांगितले. (Goa Vaccine The second phase of vaccination for 18 to 44 year olds starts from today) 

लसीचे डोस बाकी राहिले तर 21 नंतरही ते दिले जातील. राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी 32 हजार 870 कोविशिल्ड या लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. गेल्‍या दोन दिवसांत 18 ते 44 वयोगटातील 8521 जणांनी लस घेतली आहे. 18 ते 44 वयोगटासाठी लसीचा दुसरा हप्ता 12 आठवड्यानंतर मिळणार, असेही डॉ. बोरकर यांनी सांगितले.

लसीकरणावर वादळाचा परिणाम

तोक्ते चक्रिवादळामुळे राज्यभरातील बहुतांश भागातील विजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या लसिकरणावर काल त्याचा मोठा परिणाम झाला. राज्यसरकारला कोरना प्रतिबंधक सलीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळी वाऱ्याचा मोठा परिणाम लसीकरणावर झाला. विजपुरवठा बंद राहिल्याने इंटरनेट सेवाही बंद होती. त्यामुळे लसीकरणाला आलेल्या नागरीकांची नोंदणी करणे आणि इतर कामे करणे शक्य झाले नाही. काल रस्त्यावर झाडं पडल्यामुळे ज्यांनी लसीकरणासाठी नोंद केली होती. त्यातील बहुतांश नागरीक लसीकरण केद्रांपर्यंत पोहचू शकले नाहीत. त्यामुळे एकूणच जोरदार वादळीवाऱ्याच्या पावसाचा परिणाम लसीकरणावर झाल्याचे दिसून आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com