Goa:वास्कोत दामोदर भजनी सप्ताहाची तयारी पूर्णत्वास

केंद्रीय समिती अध्यक्षपदी प्रशांत जोशी, उत्सव समिती अध्यक्षपदी पुन्हा जगदीश दुर्भाटकर
Goa Vasco damodar Temple
Goa Vasco damodar TempleDainik Gomantak

दाबोळी : वास्कोचे ग्रामदैवत (Vasco Goa) श्री दामोदर मंदिराच्या (Shri Damodar Temple) केंद्रीय समिती अध्यक्षपदाची सूत्रे प्रशांत जोशी (Prashant Joshi) यांच्याकडे तर यंदाच्या श्री दामोदर सप्ताह उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जगदीश शेट दुर्भाटकर यांची तिसऱ्या वर्षी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. यंदाचा श्री दामोदर भजनी सप्ताह (Bhajan Saptah) साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी कोविड महामारीमुळे वास्कोतील दामोदर भजनी सप्ताह साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यंदा परिस्थिती आटोक्यात आली असली तरी उत्सव समितीने खबरदारीची उपाययोजना म्हणून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सप्ताह साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भजनी सप्ताह साजरा करण्यासाठी दरवर्षी जून महिन्यात मंदिरात बैठक बोलावून नवीन सप्ताह उत्सव समिती निवडण्यात येते. २०२० साली समितीच्या अध्यक्षपदी जगदीश दुर्भाटकर यांची निवड केली होती. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही कोरोनाचे संकट कायम राहिल्याने सार्वजनिकरित्या सप्ताह साजरा करणे शक्य नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीचीच उत्सव समिती यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भजनी सप्ताहाच्या इतिहासात प्रथमच दुर्भाटकर यांनी अध्यक्षपदाची हॅटट्रिक साधली आहे. त्यांच्याबरोबर सचिव संतोष खोर्जुवेकर, खजिनदार विष्णू गारोडी आणि समितीच्या इतर सर्व सदस्यही समितीवर कायम आहेत.

Goa Vasco damodar Temple
Goa: मुख्याध्यापिका करतेय असभ्य वर्तन; शिक्षकाची पोलिसात तक्रार

दुर्भाटकर हे (Jagdish Durbhatkar) धडपडी व्यक्तिमत्त्व असून समाजकार्यात त्यांचा नेहमीच वावर असतो. गेल्या वर्षी कोरोना महामारी काळात अध्यक्ष या नात्याने सप्ताहासंबंधीची कामे उरकण्यासाठी अगदी कोविड असतानाही ते सर्वत्र फिरले. सप्ताहानंतर ते कोविडग्रस्त बनले होते. जोशी कुटुंबातील परेश जोशी, (Paresh Joshi) प्रशांत जोशी, केंद्रीय समितीचे महासचिव विनायक घोंगे तसेच समितीच्या इतर सदस्यांचे सहकार्य त्यांना लाभत आहे. श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सवासाठीची तयारी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तत्पूर्वी उत्सव समितीतर्फे श्री दामोदर चरणी श्रीफळ ठेवून सप्ताह आयोजनासंदर्भात प्रार्थना करण्यात आली. यावेळी केंद्रीय समिती अध्यक्ष प्रशांत जोशी यांच्यासह वास्को सप्ताहाच्या (Goa Vasco) केंद्रीय आणि उत्सव आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. सप्ताहासाठी देणगी स्वीकारण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली असून मंदिर परिसरात देणगी स्वीकारली जात आहे.

Goa Vasco damodar Temple
South Goa: मुंडकार कायद्याखाली जमीन हक्कासाठी दाखल केलेले 1382 दावे पडून

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com