Goa News: बेवारस वाहने पालिकेकडून ‘भंगारात’

Goa News: मुरगाव नगरपालिकेची कारवाई ; वास्कोतील वाहतुकीचा अडथळा दूर
Margao Municipal Council
Margao Municipal CouncilDainik Gomantak

Goa News: वास्कोतील रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस अवस्थेत असलेल्या दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांवर मुरगाव पालिकेतर्फे कारवाई करण्यात आली. ही भंगार वाहने उचलून भंगारात टाकण्यात आल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे.

वास्कोतील रस्त्यावरील बेवारस वाहनांची ओळख करून वाहतूक पोलिसांनी वाहन व त्या वाहनांचे क्रमांक मुरगाव पालिकेला सादर केले होते. त्या आधारे पालिकेने कारवाई केल्याची माहिती नगराध्यक्ष लिओ रॉड्रिस यांनी दिली.

बेवारस वाहनांनी वास्कोतील स्वतंत्रपथ,एफएल गोम्स मार्ग, दत्तात्रे मार्ग, डॉ. लुईस मार्गाबरोबर महत्वाच्या रस्त्यांवर अतिक्रमण केले होते. या वाहनांविषयी वास्को वाहतूक पोलिसांनी मोहीम सुरू करून, त्या वाहनावर कारवाई करण्याचे कागदपत्रे मुरगाव नगरपालिकेला सादर केले होते.

वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी वास्कोतील दोन्ही मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक पोलिसांची नेमणूक करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. नार्वेकर यांनी शहरातील बेवारस स्थितीतील वाहनांची पाहणी केली. नंतर संबंधित वाहन मालकांना संपर्क साधून आपली वाहने रस्त्यावरून हटवा, असा आदेश दिला होता.

Margao Municipal Council
Goa Human Trafficking: 'वेश्याव्यवसायासाठी' महिलांची तस्करी गोव्यात सर्वाधिक

त्या आदेशाकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने अखेर वाहतूक पोलिसांनी सोपस्कार पूर्ण करून त्या वाहनांवर कारवाईचे निवेदन मुरगाव पालिकेला सादर केले. त्यानुसार कारवाईस सुरुवात केली. तसेच यापुढेही शहरातील रस्त्यांवर बेवारस स्थितीत वाहने आढळल्यास ती भंगारात टाकण्यात येतील, असे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स यांनी सांगितले.

सरकारी वाहनेच रस्त्यांवर धूळखात !

वास्कोत अनेक सरकारी कार्यालयांची वाहने भंगार होऊन रस्त्यावर चार-पाच वर्षांपासून धूळखात पडली आहेत. मुरगाव तालुका साहाय्यक वाहतूक संचालकाच्या कार्यालयासमोर अंदाजे पाच वाहने भंगार अवस्थेत आहेत. यात मुरगाव गटविकास कार्यालयाबरोबर मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाची वाहने आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com