Goa: मडगाव स्कुल कॉम्पलेक्स सहकारी पतसंस्थेतर्फे वाहन कर्जाची व्यवस्था

पतसंस्थेला ए वर्ग मानांकन व शुन्य एनपीएमुळे अभिमान
Goa: मडगाव स्कुल कॉम्पलेक्स सहकारी पतसंस्थेतर्फे वाहन कर्जाची व्यवस्था
मडगाव स्कुल कॉम्पलेक्स सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबाजी सावंत व इतर पदाधिकारी (Goa) दैनिक गोमन्तक

Goa: प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक व महाविद्यालयिन शिक्षकांसाठी आर्थिक मदतीचे उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेवुन 41 वर्षांपुर्वी सुरु करण्यात आलेल्या मडगाव स्कुल कॉम्पलेक्स सहकारी पतसंस्थेतर्फे (Margao School Complex Co-operative Credit Society) आता भागधारक शिक्षकांना वाहन कर्जाची व्यवस्था (Vehicle loan arrangement) करण्यात आल्याची घोषणा चेअरमन बाबाजी सावंत (Chairman Babaji Sawant) यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

हल्लीच झालेल्या पत संस्थेच्या बैठकीत वाहन कर्जाची योजना संमत करण्यात आली. या योजनेनुसार भागधारकाला दुचाकी किंवा चार चाकी वाहनांसाठी जास्तित जास्त 10 लाख रुपयांपर्यंत त्याच्या क्षमतेनुसार कर्ज मंजुर केले जाईल व त्यासाठी केवळ 8 टक्के व्याज आकारला जाईल. हा व्याज दर इतर पतसंस्था किंवा सहकारी बॅंकापेक्षा कमी असल्याचे सावंत यानी पुढे स्पष्ट केले. 

मडगाव स्कुल कॉम्पलेक्स सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबाजी सावंत व इतर पदाधिकारी (Goa)
Goa Monsoon Updates: पाऊस ओसरल्याने गणेशभक्तांत उत्साह

नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या कर्जदाराला व्याजावर सवलत

कर्ज  नियमितपणे फेडणाऱ्या कर्जदाराला व्याजावर 0.3 ते 0.4 टक्के पॅट्रोनेज परतावा दिला जाईल, असेही सावंत यानी सांगितले. पतसंस्थेतर्फे 10 लाखा पर्यंत वैयक्तीक कर्ज, 25 लाखापर्यंत घरासाठी कर्ज मंजुर करण्यात येते व त्यावर 9 टक्के व्याज आकारले जाते. हा व्याज दर 10 वरुन 9 टक्क्यावर आणण्यात आला आहे. कित्येक वर्षांपासुन  भागधारकांची वाहन कर्जासाठी मागणी होत होती. ती आम्ही पुर्ण केली आहे असे सचिव संदीप रेडकर यांनी सांगितले.

सद्या ही पतसंस्था प्रगतीपथावर असुन मडगाव व्यतिरिक्त काणकोण येथे विस्तार काउंटर उघडण्यात आला आहे. केपे व मुरगाव येथे काउंटरसाठी  अर्ज केला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. या पतसंस्थेचा विस्तार संपुर्ण दक्षिण गोव्यात करण्यावर आमचा भर आहे असेही सावंत यानी पुढे सांगितले.

मडगाव स्कुल कॉम्पलेक्स सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबाजी सावंत व इतर पदाधिकारी (Goa)
Vaccination: आठ दिवसात होणार १ लाख ७० हजार लसीकरण

पूर्वी पेक्षा भागधारक व भांडवल वाढले

सुरवातीस पतसंस्थेचे केवळ 36 भागधारक व केवळ 3600 रुपये भाग भांडवल होते. आता 2000 पेक्षा जास्त भागधारक व 2.66 कोटी भाग भांडवल आहे. तसेच 28 कोटी रुपयांच्या ठेवी व 26 कोटी रुपये कर्जाची रक्कम असल्याची माहिती देण्यात आली.

पतसंस्थेमध्ये एकही एनपीए खातेधारक नाही याचे कारण कर्जाचे हप्ते नियमितपणे पगारातुन कापले जातात. 2019-20 वर्षासाठी पतसंस्थेला निव्वळ नफा 22 लाख रुपये झाला. या वर्षी हा नफा दुपटीने म्हणजे जवळ जवळ 45 लाख रुपये होईल असा अंदाज आहे असेही सावंत यानी सांगितले. यंदा भागधारकांना 4.5 टक्के डिविडंट देण्यात आला.

या पत्रकार परिषदेस सचिव संदीप रेडकर, खजिनदार लॉरेन्सिया वाझ, संचालक सविता फर्नांडिस व जुझे परेरा उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com