Goa: 9 सप्टेंबर रोजी वेलंकनी सायबिणीचे फेस्त

विविध ठिकाणी प्रार्थना सभेचे आयोजन (Goa)
Goa: 9 सप्टेंबर रोजी वेलंकनी सायबिणीचे फेस्त
वेलंकनी सायबिण (Goa)दैनिक गोमन्तक

Goa: ख्रिस्ती बांधवांच्या वेलंकनी सायबीणीच्या (Velankani Saybeen) नोवेनाला सुरुवात झाली असून विविध ठिकाणी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ९ सप्टेंबर रोजी वेलंकनी सायबीणीचे फेस्त साजरे होणार आहे.

गेल्या वर्षी कोविड महामारीमुळे (Covid Epidemic) हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम तसेच इतर धर्मियांच्या सणावर विरजण पडले होते. त्यानुसार कोणत्याच प्रकारचा सण साजरा झाला नाही. मात्र यंदा कोरोना महामारीपासून काही प्रमाणात सुट मिळाल्याने हळूहळू सणासुदीला उजाळा मिळत आहे. त्यानुसार लोक आपापल्या परीने सण साजरे करण्यास तयार झाले आहेत.

वेलंकनी सायबिण (Goa)
Goa: चिकण मातीच्या मुर्त्यांना प्राधान्य द्या; विष्णू च्यारी

दरम्यान ख्रिश्चन धर्मियांचे प्रसिद्ध वेलंकनी सोयाबीनचे फेस्त जवळ आले असून तत्पूर्वी सायबीणीच्या नोवेनाला सुरुवात होत असते. ख्रिस्ती बांधव आठ दिवस प्रार्थना सभेचे आयोजन करून नवव्या दिवशी सायबीणीचे फेस्त साजरे करतात. त्यानुसार या वेलंकनी नोवेनाला सुरुवात झाली आहे.

नवेवाडे वास्को येथील फर्नांडिस यांच्या घरासमोर स्थापन केलेल्या वेलंकीनी सायबीणीच्या नोवेनाला सुरुवात झाली असून, संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत रोज प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात ख्रिस्तीबांधवाबरोबर हिंदू, मुस्लिम बांधव एकत्रित येऊन प्रार्थना सभेत सहभागी होऊन नोवेना साजरे करतात. प्रार्थना सभेनंतर फराळाचे वाटप करण्यात येते. तसेच संध्याकाळच्या वेळेत लोक सायबीणीला फुलांचे हार, फराळ प्रदान करतात. तो फराळ मग प्रार्थनासभेत उपस्थित लोकांना वितरित केला जातो. ९ सप्टेंबर रोजी वेलंकनी सायबिणीचे फेस्त साजरे होणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com