गोवा: राष्ट्रपतींच्या कार्यक्रमातील व्यत्यय भोवला; कंपनीच्या बिलात 5.50 लाखांची कपात

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

गेल्या डिसेंबर महिन्याच्या 19 तारखेला येथील कांपाल मैदानावर 60 व्या गोवा मुक्तीदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. कार्यक्रमात गोवा मुक्तीच्या यशोगाथेवर आधारित चित्रफीत दाखविली जात होती.

पणजी: राष्ट्रपतींच्या कार्यक्रमादरम्यान व्हिडीओ स्क्रिनिंगमध्ये व्यत्यय आल्याची घटना घडली होती. त्याची गंभीर दखल घेत संबंधित कार्यक्रम व्यवस्थापन कंपनीच्या बिलात तब्बल 5.50 लाखांची कपात करण्यात आली आहे. नुकताच सरकारने त्या कंपनीला हा झटका दिला. 

गेल्या डिसेंबर महिन्याच्या 19 तारखेला येथील कांपाल मैदानावर 60 व्या गोवा मुक्तीदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. कार्यक्रमात गोवा मुक्तीच्या यशोगाथेवर आधारित चित्रफीत दाखविली जात होती. दरम्यान, एलईडी स्क्रिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने ती चित्रफीत पूर्णपणे बघता आली नाही. त्याबद्दल उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली होती. 

छाननीनंतर मडगावात 115 उमेदवार रिंगणात

वास्कोस्थित कंपनीला या कार्यक्रमाच्या आयोजनाचा ठेका देण्यात आला होता. या कंपनीने सरकारला 3 कोटी 95 लाख 20 हजार 44 रुपयांचे बिल सादर केले होते. पण, कार्यक्रमातील व्यत्ययाबद्दल सदर कंपनीला दंड आकारावा अशी मागणी होती. त्याची गंभीर दखल घेत बिलात 5.50 लाखांची कपात करण्यात आली. पहिल्यांदाच सरकारने अशाप्रकारचा निर्णय घेत ठेकेदारांना जणू सूचक इशारा दिला आहे.

एक बल्ब पडला साडेपाच लाखांना!
कार्यक्रमावेळी एलईडी स्क्रीनमधील केवळ एक बल्ब खराब झाला होता. त्यामुळे कार्यक्रमाच्या रंगाचा बेरंग झाला होता. हाच एक बल्ब कंपनीला तब्बल साडेपाच लाखांना महागात पडला. कंपनीला बिलापोटी 3.89 कोटी बिल देण्यात आले.
 

संबंधित बातम्या