Goa: जागतीक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बांबोळी येथील मनोरुग्णालयाची भेट

अशा व्यक्तींना स्वयंसेवी (Volunteer) संस्थाकडे पोचवणे गरजेच आहे. अशा व्यक्तींना नातलगांच्या भावनीक आधाराची, प्रेमाची ( emotional support ,love) गरज असते.
World Mental Health Day
World Mental Health DayDainik Gomantak

पणजी: आज जागतीक मानसिक आरोग्य दिन त्या अनुषंगाने गोवा सरकारच्या बांबोळी येथील मनोरुग्णालयाशी (psychiatric hospital) संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता. बांबोळी येथील मनोरुग्णालयासह उत्तर गोव (Goa) जिल्हा इस्पितळ म्हापसा व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ मडगाव येथे मनसिक आरोग्य तापसणी केली जाते व औषधे (Medications) दिला जातात. जास्त उपचाराची गरज असलेल्या व्यक्तीला बांबोळी येथील मनोरुग्नालयात पाठवले जाते. तेथेही तपासणी व औषधोपचारासह जास्त दिवस उपचारासाठी ॲडमीट करण्याची सोय आहे. बांबोळी येथे 12 वार्ड असून तेथे 200 रुग्ण सध्या ॲडमीट आहेत. दररोज 70 ते 80 व्यक्ती येथे तपासणीसाठी येतात. त्यातील 10 ते 15 व्यक्तींना ॲडमीट केले जाते.

गोवा सरकारच्या बांबोळी येथील मनोविकार आणि मानवी वर्तणूक संस्था अर्थात मनोरुग्णालयात 70 च्यावर परप्रांतिय व्यक्ती अशा आहेत ती त्या ठणटणीत बऱ्या झालेल्या असूनही स्वताच्या घरी जाण्यास इच्छुक आहेत. मात्र त्यांच्या नातलगांचे संपर्क क्रमांक बंद असल्याने व आपला पत्ता त्यांना आठवत नसल्याने सरकारला इच्छा असुनही सदर व्यक्तींना त्यांच्या घरी पाठवता येत नाहीय.

World Mental Health Day
Goa: उ.मा. विद्यालयातील 11 वी 12 वीच्या परिक्षा ऑफलाईन पद्धतीने

'न्याहो आम्हाला घरी न्या':

जे 200 व्यक्ती बांबोळी मनोरुग्णालयात ॲडमीट आहेत त्यातील 70 च्यावर असे व्यक्ती आहेत की ते गेली 5 ते 10 वर्षे येथे उपचार घेऊन बरे झालेले आहेत. मात्र त्यांना त्यांच्या घराचा पत्ता आठवत नाही. तसेच त्यांच्या नातेवाईकांनी दिलेला संपर्क क्रमाक लागत नाही. बरे झालेल्या व्यक्तींना रेल्वेत तिकीट काढून देऊन पाठवण्याचा प्रयोग यापुर्वी केले गेला होता, मात्र सदर व्यक्ती भलत्याच जागी पोचल्याचे स्पष्ट झाल्याने त्या व्यक्तीला पुन्हा आणण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळे सदर व्यक्ती न्या हो मला घरी परत न्या! असा मनोमनी धावा करत कुणीतरी नातलग येऊन आपणास घेऊन जाईल या आशेवर जगत आहेत.

देशात गोव्यात चांगली सोय:

सर्व शाळात समुपदेशक नेमूण विद्यार्थ्यांना येणाऱ्या मानसीक दडपणावर मात करण्याची सोय फक्त गोव्यात आहे. इतर राज्याच्या तुलनेने गोव्यात मनोरुग्णावर उपचार करण्याच्या चांगल्या सोयी आहेत. दक्षिण गोवा व उत्तर गोवा सराकरी इस्पितळासोबतच बांबोळी येथेही मोफत तपासणी व औषधे दिली जातात. त्याच सोबत उत्तर गोव्यातील सरकारी आरोग्य केंद्रातही आठवड्यातील दोन दिवस जाऊन सायक्रेटीक्स रुग्णांना तापसणी करतात. कोरोनापुर्वी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनाच (Doctor) सायक्रेटीक्स प्रमाणे तपासणी करण्याचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले होते.

World Mental Health Day
Goa: राज्यात 710 कोरोना बाधीत तर 3 जणांचा मृत्यू

सोशल वर्करनी जबाबादरी घ्यावी:

सरकारने जे मनोरुग्ण बरे झालेत त्यांना त्यांच्या नातलगांचा शोध घेऊन त्यांच्या घरी पोचवण्यासाठी सोशल वर्कर नेमले आहेत. त्यांनी जबाबदारी घेऊन बांबोळी येथे बरे होऊनही नातलगांच्या संपर्काच्या अभावने अडकून पडलेत त्यां व्यक्तींना त्यांच्या घरी पोचवण्यासाठी जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. किंवा अशा व्यक्तींना स्वयसेवी संस्थाकडे पोचवणे गरजेच आहे. अशा व्यक्तींना नातलगांच्या भावनीक आधाराची, प्रेमाची गरज असते. असे डॉ. रुपेश पाटकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com