Goa: श्रीधरन पिल्लाई सासष्टी व काणकोण मधील विद्यार्थी वसतिगृहाना देणार भेट

संकल्प संचलित लोलये येथील कन्या वसतीगहाला भेट देऊन संस्थेच्या चालकांशी संवाद साधणार आहेत.
Goa: श्रीधरन पिल्लाई सासष्टी व काणकोण मधील विद्यार्थी वसतिगृहाना देणार भेट
श्रीधरन पिल्लाईDainik Gomantak

काणकोण: राज्यपाल श्रीधरन पिल्लाई (P. S. Sreedharan Pillai) शनिवारी सासष्टी व काणकोण मधील विद्यार्थी वसतिगृहाना भेटी देतील.

राज्यपाल श्रीधरन पिल्लाई शनिवारी सासष्टी व काणकोण मधील विद्यार्थी वसतिगृहाना (Student hostel) अर्थीक मदत देण्यासाठी भेट देणार आहेत.सासष्टी तालुक्यातील कोलवा येथील वालेनिना लिटल हेव्हन येथे सकाळी 11 वाजता त्यानंतर 12 वाजता बाणावली येथील फातमा आसरा या संस्थेला ते भेट देतील.

श्रीधरन पिल्लाई
काणकोण येथे शाळांमध्ये मध्यान्ह आहार योजनेत मुलांना कुजके बटाटे

मडगाव येथील गेस्ट हाऊस मध्ये जेवण घेऊन संध्याकाळी 4 वाजता केशव साधना संचलित तेबेवाडा- चाररस्ता येथील माताजी मंदिर वसतीगृहाला भेट देतील.संध्याकाळी 5 वाजता सेवा संकल्प संचलित लोलये येथील कन्या वसतीगहाला भेट देऊन संस्थेच्या चालकांशी संवाद साधणार आहेत.या संदर्भात राजभवन कार्यालयाने दक्षिण गोवा जिल्हा धिकाऱ्याना कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com