Goa: विठ्ठलापूर-साखळी पुलाजवळील रस्त्याचे काम पुन्हा एकदा सुरु
रस्त्या डागडुजीचे काम पुन्हा सुरु केले आहे. Dainik Gomantak

Goa: विठ्ठलापूर-साखळी पुलाजवळील रस्त्याचे काम पुन्हा एकदा सुरु

या समस्येकडे गेल्या बुधवारच्या (ता.29) दै.'गोमन्तक' मधून लक्ष वेधण्यात आले होते. अखेर डागडुजीचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे.

डिचोली: खड्डेमय बनलेल्या डिचोली-साखळी रस्त्याच्या डागडुजीचे बंद पडलेले काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यावरील (Road)विठ्ठलापूर-साखळी येथील पुलाजवळील खड्डेही अखेर बुजविण्यात आल्याने वाहनचालकात(Drivers) समाधान व्यक्त होत आहे. साखळी पुलाजवळील खड्डे बुजविण्यात आले असले, तरी दुसऱ्या बाजूने डिचोली-म्हापसा मार्गावरील अस्नोडा पुलाजवळील खड्डे मात्र प्रतीक्षेत आहेत. ते बुजविण्याकडे अद्याप लक्ष गेलेले नाही. परिणामी वाहनचालकांचा कसरतीचा खेळ चालूच आहे.

डागडुजीचे काम पुन्हा सुरु:

गेल्या महिन्यात खड्डेमय बनलेल्या डिचोली-साखळी रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले होते. कुळण-सर्वण येथील आधार हॉस्पिटलजवळील (Hospital)रस्त्यावरील खड्डे बुजविल्यानंतर डागडुजीचे काम बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकात आश्चर्य तेवढीच नाराजी व्यक्त होत होती. परिणामी हा रस्ता खिळखिळा बनत चालला होता. खड्डेही रुंदावत होते. या समस्येकडे गेल्या बुधवारच्या (ता.29) दै.'गोमन्तक' मधून लक्ष वेधण्यात आले होते. अखेर आज रविवारपासून डागडुजीचे काम पुन्हा हाती घेताना साखळी-विठ्ठलापूर पुलाजवळील (bridge)धोकादायक खड्डे बुजविण्यात आले.

रस्त्या डागडुजीचे काम पुन्हा सुरु केले आहे.
Goa: डिचोली येथे रस्त्याच्या बाजूला बसलेल्या विक्रेत्यांना हुसकावले

अस्नोड्यातील खड्डे बुजवा:

डिचोली-म्हापसा (Mhapsa)मार्गावरील अस्नोडा पुलाजवळील धोकादायक खड्डे त्वरित बुजवा. अशी मागणी वाहनचालक करीत आहेत. पारच्या बाजूने पुलाला जोडलेल्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, हा रस्ता पूर्णपणे खिळखिळा बनला आहे. पुलावरील खड्डयांकडे लक्ष वेधण्यासाठी गांधी जयंतीदिनी (Gandhi Jayanti) काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. खड्डयांनी झोपून सरकारचा निषेधही केला होता. या आक्रमक आंदोलना नंतर अस्नोडा पुलाजवळील खड्डे बुजविण्यासाठी हालचाली सुरु होणार असल्याचा अंदाज होता. मात्र अद्याप तसे काहीच झालेले नाही.

Related Stories

No stories found.