गोव्यात दुपारी १२ वाजेपर्यंत २६.३२ टक्के मतदानाची नोंद

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीच्या मतदानाला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरूवात झाली.  राज्यात दुपारी १२ वाजेपर्यंत पर्यंत जवळपास २६.३२ टक्के मतदानाची नोंद झाली.

पणजी :  गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीच्या मतदानाला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरूवात झाली.  राज्यात दुपारी १२ वाजेपर्यंत पर्यंत जवळपास २६.३२ टक्के मतदानाची नोंद झाली. १२ वाजेपर्यंत उत्तर गोव्यात २६.७८  टक्के तर दक्षिण गोव्यात  २५.७९  टक्के मतदानाची नोंद झाली.

मतदान केंद्राबाहेर दोन मीटरवर वर्तुळे काढण्यात आली आहेत. त्या वर्तुळातच मतदारांना उभे राहावे लागणार आहे. मतदान केंद्रातील कर्मचारी हातमोजे घालून वावरणार असून पुरेसे शाररिक अंतर पाळून मतदान केल्यानंतरची शाई बोटाला लावण्यात येत आहे. 

शिक्का हाताळणीनंतर निर्जंतूक 

मतदान हे मतपत्रिकेवर शिक्का मारून केले जात आहे. एकदा मतदाराने शिक्क्याची हाताळणी  एका मतदान केंद्रावर सरासरी आठशे मतदार असल्याने एका मतदाराला दोन मिनिटांचा कालावधी मतदानासाठी लागल्यास १६०० मिनिटे लागणार आहेत. याचा अर्थ २६ तास लागतील. सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत ४८० मिनिटे मतदानासाठी मिळणार आहेत. त्यामुळे मतदानाचा वेग वाढवण्यासाठी एक मतदार जास्तीत जास्त एका मिनिटभरात मतदान करून मतदान केंद्राबाहेर पडेल, अशी व्यवस्था करण्यात कर्मचाऱ्यांची कसोटी लागत आहे.

संबंधित बातम्या