Goa Congress: 'ती' CM प्रमोद सावंत यांची बेनामी कंपनी? अफवेबद्दल काँग्रेसने मागितले स्पष्टीकरण

काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर टिकास्त्र सोडले.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress: ई-लिलाव खनिजाच्या वाहतुकीचे कंत्राट देण्यात आलेली 'सूर्या ट्रान्सपोर्ट' ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची 'बेनामी कंपनी' असल्याच्या अफवेबद्दल काँग्रेस पक्षाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर टिकास्त्र सोडले. उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर व दक्षिण गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश नादर हेही उपस्थित होते.

"माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे विधान आजही लोकांनी आठवते की त्यांनी स्वतः २०१२ मध्ये खनीज काम स्थगित केले होते, जे भाजप सरकार प्रत्येक निवडणुकीत आश्वासने देऊनही पुन्हा सुरू करण्यात अपयशी ठरले आहे. आज सर्व खाण अवलंबित त्रस्त आहेत आणि अनेकांना उत्पन्नाचे साधन नाही. तथापि, एका ‘सूर्य ट्रान्सपोर्ट’ला संपूर्ण गोव्यात ई-लिलाव झालेल्या खनिजाचे सर्व वाहतूक कंत्राट मिळत आहे. अनेक वाहतूक कंत्राटदार आहेत, फक्त ‘सूर्या ट्रान्सपोर्ट’लाच ही कंत्राटे का मिळत आहेत," असा सवाल भिके यांनी केला.

प्रमोद सावंत या ‘सूर्या ट्रान्सपोर्ट’ आस्थापना मध्ये भागीदार आहेत किंवा ते ‘बेनामी’ पद्धतीने ती चालवत असल्याची अफवा आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे. असे भिके म्हणाले.

Goa Congress
Karnataka Viral Video: 'इडली सांबर अच्छा है, गोवावाला...', कर्नाटकात काँग्रेस आमदार समर्थकांनी घोषणा देताना ओलांडली मर्यादा

"पर्रीकर संरक्षणमंत्री असताना त्यांनी 50 ते 80 हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते, नंतर प्रमोद सावंत यांनीही 8 ते 10 हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. “या सगळ्या नोकऱ्या कुठे गेल्या? हे सरकार आमच्या तरुणांना का फसवत आहे आणि त्यांच्या संयमाची परीक्षा का घेत आहे," असा सवाल भिके यांनी उपस्थित केला.

"2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा नोकऱ्यांचे आश्वासन देईल. तरुणांनी त्यांच्या डावपेचांना बळी पडू नये असे आवाहन मी करत आहे." असे भिके म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com