उशाला कळसा तरीही पिसुर्ले वासीयांचा घसा कोरडा..!

जल कुंभ उभारून सुद्धा या भागातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होत
Goa : पिसुर्ले शांतीनगर येथिल टेकडीवर उभारण्यात आलेला हाच तो पाणी प्रकल्प असा झाडा झुडपाच्या विळख्यात सापडलेला आहे, तर उंच दिसणारी टाकी अद्याप वापरात आणल
नाही.
Goa : पिसुर्ले शांतीनगर येथिल टेकडीवर उभारण्यात आलेला हाच तो पाणी प्रकल्प असा झाडा झुडपाच्या विळख्यात सापडलेला आहे, तर उंच दिसणारी टाकी अद्याप वापरात आणल नाही.Dainik Gomantak

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात येणाऱ्या पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील नागरिकांची मनोसुक्त तान भागावी या उद्देशाने त्यावेळच्या पंचायत मंडळाच्या प्रयत्नाने आणि या भागाचे आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या सहकार्याने पिसुर्ले शांतीनगर येथिल उंच टेकडीवर सन 2011 साली भला मोठा जल कुंभ उभारून सुद्धा या भागातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासुन बऱ्याच वाढलेल्या आहेत.

Goa : पिसुर्ले शांतीनगर येथिल टेकडीवर उभारण्यात आलेला हाच तो पाणी प्रकल्प असा झाडा झुडपाच्या विळख्यात सापडलेला आहे, तर उंच दिसणारी टाकी अद्याप वापरात आणल
नाही.
Goa: नौदलातर्फे INHS रक्तदान शिबिराचे आयोजन

त्यामुळे पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील सर्व वाड्याच्या उशाशी असलेल्या जल प्रकल्प असून सुद्धा त्याचा घसा कोरडा का असा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे. पर्ये मतदार संघात येणाऱ्या पिसुर्ले पंचायत क्षेत्र हे पुर्ण पणे खाण व्याप्त भाग आहे, त्यामुळे येथील सर्व नैसर्गिक विहीरी, नाले तसेच जलाशय पुर्ण पणे लुप्त झाले आहेत. यामुळे या भागातील नागरिकांना नळाचे पाणी हेच पिण्याच्या तसेच इतर कामाचे साधन आहे. परंतु हेंच पाणी जर मुबलक मिळत नाही, तर मग नागरिकांनी करावे तरी काय असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. या गावातील कायम स्वरुपी पाण्याचा प्रश्न सुटवा या उद्देशाने या भागाचे आमदार प्रतापसिंह राणे यांच्या मुख्यमंत्री असलेल्या काळात सन 2006 साली येथिल शांतीनगर वाड्याच्या उंच अशा टेकडीवर सरकारने करोडो रुपये खर्च करून जल प्रकल्प उभारण्यात आला तर त्या प्रकल्पाचे उद्घाटन सन 2011 साली करून त्याचे लोकाअर्पण करण्यात आले होते.

सदर प्रकल्पातून पिसुर्लेतील गावकरवाडा, देऊळवाडा, शिंगणे, वाघुरे, पणसे, धाटवाडा, धोणकल आणि शांतीनगर येथिल नागरिकांना पाण्याची सोय व्हावी यासाठी सर्व प्रकारची साधन सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. परंतु एवढी सगळी व्यवस्था उभारून सुद्धा नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसल्याच्या वाढत्या तक्रारी समोर येत आहेत. या संबंधी पंचायत मंडळाच्या वतीने वेळोवेळी संबंधित यंत्रणेकडे तक्रारी करून सुद्धा काहीच निष्पन्न होत नसल्याने पंचायत मंडळ सुद्धा हतबल झाले आहेत.

या प्रकरणी पंच देवानंद परब यांनी सांगितले की सदर ठिकाणी पाणी प्रकल्प असून सुद्धा या भागांत योग्य पाणी पुरवठा होत नाही, त्यामुळे नागरिक दोष पंचायत मंडळाला देतात, परंतू पंचायतीच्या वतीने संबंधित खात्याला निवेदने दिली आहेत, पण त्यांच्या कडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सरकारने या प्रकरणी तातडीने दखल घेऊन या गावातील पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे.

Goa : पिसुर्ले शांतीनगर येथिल टेकडीवर उभारण्यात आलेला हाच तो पाणी प्रकल्प असा झाडा झुडपाच्या विळख्यात सापडलेला आहे, तर उंच दिसणारी टाकी अद्याप वापरात आणल
नाही.
पर्वरी बसथांब्‍यावर प्रवाशी जीव मुठीत घेऊन ओलांडतात रस्‍ता

या संदर्भात खरी स्थिती जाणून घेण्यासाठी येथिल जल प्रकल्पावर जाऊन चौकशी केली असता समजले की या प्रकल्पात सांखळी पोडोसे येथिल जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी सोडले जाते व ते पाणी पिसुर्ले येथिल जल कुभांतून फक्त पिसुर्ले गावातील काही रस्त्यांच्या बाजूला असलेली घरे व सगळे पाणी पणसे, शिंगणे व वाघुरे येथिल नागरिकांना पुरविले जाते. या गावातील धाटवाडा, धोणकल आणि शांतीनगर येथिल नागरिकांना थेट पोडोसे येथिल जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. त्याच प्रमाणे पिसुर्ले गावातील गावकरवाडा, देऊळवाडा व कुंभारखण या भागातील नागरिकांना

वाळपई येथिल पाणी प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोडोसे पाणी प्रकल्पातून पाणी दररोज सोडले जात असल्याने या पाणी प्रकल्पातून पाणी पुरवठा होत नाही असे होऊ शकत नाही, मात्र कधी पोडोसे पाणी प्रकल्पांत बिघाड निर्माण झाल्यास या पाणी प्रकल्पांत पाणी पुरवठा होत नाही, परंतू या दिवसात अशी काही घटना घडली नाही, असे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीवरून समजले. तर मग या पाणी प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाणी मुरते कुठे असा प्रश्न येथे उपस्थित केला तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे या प्रकल्पातून मुबलक पाणी सोडले जाते तर ते पाणी नागरिका पर्यंत का पोचत नाही याचे संशोधन होणे गरजेचे आहे.

या ठिकाणी उभारण्यात आलेल्या जलप्रकल्पा बाबतीत एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, येथे सुरवातीला योग्य नियोजन करून जलशुद्धीकरण प्रकल्पातून थेट पाणी आणून एका भल्या मोठ्या टाकीत साठवून नागरिकांना पुरवठा करण्यासाठी त्या प्रमुख टाकीच्या जवळ एक उंच टाकी उभारली आहे, परंतू प्रकल्प सुरू दहा वर्षे झाली तरी त्या टाकीत एक थेंब सुद्धा पाणी पडले नसल्याची माहिती मिळाली आहे. यावरून नागरिकांना चौवीस तास पाणी उपलब्ध करून देण्याची घोषणा करणारे सार्वजनिक बांधकाम खाते किती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या वापरासाठी बांधण्यात आलेली ही उंच टाकी सद्या शोभेची वस्तू बनली आहे.

दरम्यान या गावात होणाऱ्या पाणी टंचाई विषयी जाणून घेण्यासाठी त्या पाणी पुरवठा प्रकल्पाला भेट दिली असता, तेथे बरीच असुरक्षितता निर्माण झाल्याचे दिसून आले आहे, सदर ठिकाणी असलेल्या टाकी सभोवताली मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे तसेच गवत वाढून जणू काही भर जंगलात सदर पाणी प्रकल्प असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे सेवा बजावणाऱ्या कामगार वर्गाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com