गोव्याच्या जलक्रीडा धोरणात बदल..

गोव्याच्या जलक्रीडा धोरणात बदल..
Goa water sports policy has been notified all the precautionary measures are included

पणजी :   राज्यातील समुद्रकिनाऱ्यावरील जलक्रीडा प्रकारांसाठी नियमावली तयार करून जलक्रीडा धोरण अधिसूचित केले आहे. त्यामुळे जलक्रीडा प्रकार व्यवसायिकांना या धोरणानुसार यापुढे कायदेशीर नियम लागू होऊन त्यावर निर्बंध लागू होणार आहे. या धोरणानुसार जलक्रीडा सकाळी ८ ते संध्याकाळी काळोख पडेपर्यंत (संध्या. ६.३० वा.) सुरू ठेवता येणार आहे. 

या जलक्रीडा धोरणानुसार या जलक्रीडा प्रकारातील व्यवसायिकांवर पर्यटन खात्याचे नियंत्रण राहणार आहे. समुद्रकिनाऱ्यावरील धोका असलेल्या परिसरात तसेच असुरक्षित हवामानावेळी तसेच पावसाळ्यात, वादळ असेल त्यावेळी या जलक्रीडा प्रकारांना बंदी असेल. या जलक्रीडा प्रकारांतील व्यवसायिकांना या अधिसूचितकेलेल्या जलक्रीडा धोरणामुळे सर्व नियम व अटी लागू राहणार आहे व त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई होऊ शकते.

अधिक वाचा : 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com