Goa: बाणावलीमधील आलेमावांची भीती आम्हा नाही

आम आदमी पार्टीतर्फे निषेध (Goa)
Goa: बाणावलीमधील आलेमावांची भीती आम्हा नाही
Protest Against NCP Leader Charchil Alemao by by AAP Activists. (Goa)Dainik Gomantak

मडगाव ः (Margao Varca) वार्का येथील चर्चिल आलेमाव यांच्या समर्थकांनी आम आदमी पार्टीचे नेते कॅप्टन वेंझी व्हिएगस यांचे बॅनरची तोडफोड केल्याप्रकरणी गोव्यातील आपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत आम्ही चर्चिल आलेमाव व त्यांच्या गुंडांनाही भीत नाही, असे सांगितले. (Protest by Aap Activists) चर्चिल आलेमाव यांनी यांनी आपल्या द्वेषपूर्ण राजकारणाच्या (Politics) विचारधारेसह आपल्या कार्यकर्त्यांमार्फत कॅप्टन वेंझी व्हिएगस यांचे बॅनर्सची (Banner's) तोडफोड केल्याचा आरोप आपने केला.

Protest Against NCP Leader Charchil Alemao by by AAP Activists. (Goa)
Goa Floods: घरात पाणी घुसल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

आपले नेते कॅप्टन वेंझी म्हणाले, आलेमाव हे भाजपसोबत हातमिळवणी करणारे म्हणून ओळखले जातात. गोंयकरांना स्वच्छ राजकारण आणि सुशासन देण्यासाठी आप कार्यरत आहे. आमच्या पाठिशी सर्व बाणावलीकर असल्याने आम्ही आलेमाव यांना भीत नसल्याचे सांगितले. जर चर्चिल हे विवेक शुद्ध असतील तर त्यांनी या तोडफोडीचा निषेध केला पाहिजे. बाणावलीचे लोक आपचे समर्थन करतात आणि गोव्यात आपण जे सकारात्मक राजकारण आणत आहोत, त्यासाठी या हल्ल्यांचा सामना करण्यास आम्हाला भीती वाटत नाही, असेही व्हिएगास म्हणाले.

Protest Against NCP Leader Charchil Alemao by by AAP Activists. (Goa)
Goa Monsoon Updates: कुशावतीला पूर, पारोडा पूल पाण्याखाली

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com