Goa Weather Alert : राज्यात पुढच्या 3-4 तासांत पावसाची शक्यता

पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह तुरळक अवकाळी पावसाची शक्यता
Heavy rains in goa
Heavy rains in goaDainik Gomantak

पुढील काही तासांत राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील काही ठिकाणी 3 ते 4 तासांत पावसाची शक्यता आहे.

राज्यातील हवामानात आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्याने ट्रफ निर्माण झाला असून कोकण आणि कर्नाटक प्रातांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील वातावरण ढगाळ असेल तसेच पाऊसही बरसणार आहे.

Heavy rains in goa
H3N2 Virus : गोवा सरकार H3N2 व्हायरससाठी प्रतिबंधात्मक बैठक घेणार; विश्वजित राणेंची माहिती

पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह तुरळक अवकाळी पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. धारगळ, सत्तरी, पेडणे आदी तालुक्यात प्रामुख्याने पाऊस बसरेल. किनारी भागात 17 मार्चनंतर पावसाची शक्यता आहे.

व्हायरल व्हिडिओ, संदेशामुळे संभ्रम : राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊसाची तसेच येत्या काही दिवसांत वादळी वाऱ्याची शक्यता असल्याचे काही खोटे व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत गोवा वेधशाळेचे वैज्ञानिक एम. राहुल यांनी सांगितले, की सद्यस्थितीत राज्यात कोणत्याच प्रकारच्या वादळाची शक्यता नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com