इफ्फीच्या पूर्वतयारीला पावसाचे ग्रहण...!

राज्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा यलो अलर्ट जारी..
इफ्फीच्या पूर्वतयारीला पावसाचे ग्रहण...!
Goa Weather Dainik Gomantak

पणजी: शुक्रवारी दुपारी पावसाने पुन्हा राज्याला (Goa Weather) झोडपले. सोमवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून मंगळवारपासून पाऊस उसंत घेईल, असे हवामान खात्याच्या (Weather department) वेधशाळेने म्हटले आहे. दुपारी साडेतीन नंतर पावसाने अचानक जोर धरल्याने शहरात सुरू असलेली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची पूर्वतयारी तसेच इतर कार्यक्रमांना ब्रेक लागला. त्याशिवाय अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.

Goa Weather
चोर्ला घाटातून अवजड वाहतुकीला परवानगी..!

राज्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. शुक्रवारी राज्यात काणकोण, केपे भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. त्याशिवाय पणजी शहरातही तुफान पाऊस कोसळल्याने ठिकठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली होती.

लाटा उसळण्याचा धोका

वादळी वाऱ्याचा वेग ताशी 60 कि.मी. इतका असून काही ठिकाणी झाडाच्या फांद्या कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. समुद्रात लाटांची उंची 3.5 फुटांपर्यंत वाढण्याची शक्‍यता असल्याने मच्छीमारांंनी खोल समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान खात्याच्या वेधशाळेने केली आहे. त्याशिवाय राज्यातील सर्व किनाऱ्यांवर पर्यटकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Goa Weather
टिप्पर ट्रकच्या बॅटरी चोरट्यांना अटक..!

पर्यटकांचा अतिउत्साह

समुद्र खवळलेला असल्याने सर्व किनाऱ्यांवर धोक्याची सूचना देणारे झेंडे लावण्यात आले आहेत. तरीही पर्यटक खवळलेल्या समुद्राकडे धाव घेत आहेत. गेल्या आठवडाभरात 15 जणांना वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले आहे. आजही समुद्र खवळलेला होता. शुक्रवारी बागा किनाऱ्यावर दोन पर्यटक बालंबाल बचावले. मात्र, त्यांना वाचविताना ‘दृष्टी’चे जीवरक्षक नारायण गोवेकर हे गंभीर जखमी झाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com