Goa Weather: पुढील 5 दिवसांसाठी हवामान खात्यातर्फे 'असे' असेल हवामान

आज आणि उद्या ढगाळ वातावरण राहील.
Goa Weather
Goa WeatherDainik Gomantak

Goa Weather : वेधशाळेने अंदाज वर्तवल्या प्रमाणे काल राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी संततधार होती तर काही ठिकाणी थोडाच वेळ पण मुसळधार पाऊस अनुभवता आला. पर्वरी, बार्देशसोबतच गोव्याचे महत्वाचे शहर पणजीमध्येही मुसळधार पावसाची (Rain in goa) बरसात झाली आहे. गोव्यातील डिचोली, म्हापसा, बांबोळी, हळदोण, मये, साखळी या भागात काल दिवसभरात पाऊस पडला होता. आणि सगळीकडेच ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.

आजही भारतीय हवामान विभाग (IMD) खात्याने यासंदर्भातील पुढील माहिती दिली आहे. विभागाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन याची माहिती दिली आहे. त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे, '24 जानेवारी 2022 पासून 5 दिवस उत्तर (North Goa) आणि दक्षिण गोव्यात (South Goa) कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या ढगाळ वातावरण राहील. 48 तासांत किमान तापमान 2-3 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये हळूहळू सुमारे 2 अंश सेल्सिअसने वाढ होईल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com