Goa: संचारबंदीतही डिचोलीत साप्ताहिक बाजार

सामाजिक नियम कोणासाठी? नागरिकांचा संतप्त सवाल. (Goa)
Goa: संचारबंदीतही डिचोलीत साप्ताहिक बाजार
Weekly Market in Bicholim, Goa.Tukaram Sawant / Dainik Gomantak

Bicholim: संचारबंदीनंतर (Curfew) तब्बल तीन महिन्यानंतर आज (बुधवारी) डिचोलीत नियमितप्रमाणे नसला तरी काही प्रमाणात साप्ताहिक बाजार भरला होता (Weekly Market). त्यामुळे बाजारात वर्दळही दिसून येत होती. एकाबाजूने 'कोविड' नियंत्रणात येण्यासाठी लागू केलेली संचारबंदी सरकारने अद्याप पूर्णपणे मागे घेतलेली नाही. त्यातच साप्ताहिक बाजारासही सरकारने अजूनही अनुमती दिलेली नसताना, डिचोलीत साप्ताहिक बाजार भरणाऱ्या पारंपरिक जागेत आज काही भाजी विक्रेत्यांनी (Vegetable seller) आपला मोर्चा वळवून भाजी विक्रीचा धंदा केला. भाजी खरेदीसाठी ग्राहक (Customer) त्याठिकाणी गर्दी करीत होते. जवळपास 25 भाजी विक्रेत्यांनी बाजाराच्या ठिकाणी आपला व्यवसाय थाटला होता (25 Seller in market). सायंकाळपर्यंत हे विक्रेते बाजारात होते. दरम्यान, परवानगी नसतानाही काही भाजी विक्रेत्यांनी साप्ताहिक बाजार भरणाऱ्या बाजार संकुलाबाहेरील जागेत आपला व्यवसाय थाटल्याने बाजारातील अन्य नियमित भाजी विक्रेत्यांनी आश्चर्या तसेच नाराजीही व्यक्त केली. (Goa)

Weekly Market in Bicholim, Goa.
Goa Fish: मासेमाऱ्यांच्या जाळ्यात बांगडे आणि कोळंबी

तीन महिन्यांपासून बाजार बंद

'कोविड' महामारीचा संसर्ग बळावल्यानंतर गेल्या 9 मे पासून सरकारने संचारबंदी लागू केलेली आहे. त्याच्याआधी चार दिवस डिचोलीत कडकडीत टाळेबंदी पाळण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत डिचोलीत साप्ताहिक बाजारावर मर्यादा आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने शिथीलता वगळता सरकारने अद्याप संचारबंदी मागे घेतलेली नाही. आणि साप्ताहिक बाजारही भरविण्यास अनुमती दिलेली नाही. मात्र आज डिचोलीत काही प्रमाणात साप्ताहिक बाजार भरल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त करून, संचारबंदी आणि सामाजिक नियम कोणासाठी? असा प्रश्न उपस्थित केला.

Weekly Market in Bicholim, Goa.
Goa: लॉटरी ही गणेशोत्सव मंडळाचा आर्थिक कणा; सभापती पाटणेकर

अजून परवानगी नाही

साप्ताहिक बाजार भरण्यास अजून पालिकेने परवानगी दिलेली नाही. ग्राहकांची गैरसोय आणि विक्रेत्यांच्या रोजीरोटीचा विचार करून सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सामाजिक नियम पाळून नियमित विक्रेत्यांना धंदा करण्यास अनुमती दिलेली आहे. साप्ताहिक बाजारात विक्रेत्यांची गर्दी झाल्याची कोणी तक्रारही केलेली नाही. बाजारात विक्रेत्यांची गर्दी होत असेल, तर नक्कीच त्यावर नियंत्रण आणण्यात येईल.

- कुंदन फळारी, नगराध्यक्ष, डिचोली.

Related Stories

No stories found.