Goa: वजन आणि माप खात्याची डिचोलीत धाड

हार्डवेअर (Hardware) दुकानातून बनावट माल साहित्य, सध्या चतुर्थीचे दिवस असल्याने वजन माप खात्याने मोहीम हाती घेतली आहे. डिचोली आणि साखळी शहरात ही मोहीम चालूच राहणार असल्याचे कांदोळकर यांनी सांगितले.
Goa: वजन आणि माप खात्याची डिचोलीत धाड
चतुर्थीचे दिवस असल्याने वजन माप खात्याने मोहीम हाती घेतली आहे.Dainik Gomantak

डिचोली: वजन आणि माप खात्याने शनिवारी (ता. 4) दुपारी डिचोलीत एका हार्डवेअर (Hardware) दुकानावर धाड (Forage) घालून बनावटरित्या विक्रीस ठेवलेला माल जप्त केला. यात ड्रील मशीन आदी पॉवर टूल साहित्य जप्त केले. येथील दीनदयाळ सभागृहाजवळील महालक्ष्मी सेल्स अँड सर्व्हिस (Mahalakshmi Sales and Service) या दुकानावर ही धाड घालण्यात आली. जप्त केलेल्या मालावर उत्पादक कंपनी, उत्पादन तारीख याची माहिती नमूद करण्यात आली नव्हती. काही टूलांवर किंमत नमूद करण्यात आली नव्हती. तर काही उत्पादनावरील किंमत काढून टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे. ग्राहक सुविधा नंबरही नव्हता.

चतुर्थीचे दिवस असल्याने वजन माप खात्याने मोहीम हाती घेतली आहे.
Goa: खासगी वाहनांमुळे रेंट ए कॅबला फटका; कारवाईची मागणी

खात्याचे लीगल मेट्रोलॉजी निरीक्षक विकास कांदोळकर (Vikas Kandolkar) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या मालाचे मूल्यमापन केल्यानंतर संबंधित दुकानादारा विरोधात कायद्यातर्गत गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक कांदोळकर यांनी दिली. सण, उत्सव काळात काही आस्थापनांतून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार अधिक असतात. सध्या चतुर्थीचे दिवस असल्याने वजन माप खात्याने मोहीम हाती घेतली आहे. डिचोली आणि साखळी शहरात ही मोहीम चालूच राहणार असल्याचे कांदोळकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com