Vaccinationसाठी लहान मुलांसह आई उन्‍हात ताटकळत
Conducted a surprise inspection at the Vaccination centre in Asilo Hospital, Mapusa to take stock of the arrangements. Dainik Gomantak

Vaccinationसाठी लहान मुलांसह आई उन्‍हात ताटकळत

आरोग्‍यमंत्र्यांनी अचानक आरोग्‍य केंद्राला भेट दिल्यामुळे हा सावळा गोंधळ त्यांच्या लक्षात आला

म्‍हापसा: म्हापसा (Mapusa) येथील जुन्या आझिलो इस्पितळातील म्हापसा नागरी आरोग्य केंद्रात लहान मुलांना घेऊन त्यांच्या आई लस घेण्यासाठी कडक उन्हात रांगेत ताटकळत थांबल्‍याचे आरोग्‍यमंत्री विश्‍वजित राणे (Health Minister Vishwajit Rane) यांच्‍या निदर्शनास आले. सदर घटना काल गुरुवारी घडली. आरोग्‍यमंत्र्यांनी अचानक आरोग्‍य केंद्राला भेट दिल्यामुळे हा सावळा गोंधळ त्यांच्या लक्षात आला. त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व एक तासाच्या आत यंत्रणा उभारा, असा इशारा दिला. त्‍यामुळे अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

आरोग्‍यमंत्र्यांच्‍या अचानक भेटीमुळे म्हापसा नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. लहान मुलांना घेऊन त्यांच्या मातोश्री रांगेत उभ्या होत्या. कडक ऊन असतानाही त्‍यांच्‍यासाठी निवाऱ्याबाबत कुठलीही सुविधा नव्‍हती. लसीकरणावेळी कुठल्याही प्रकारची शिस्त नव्हती. लस घेण्यासाठी मुले व मातांसाठी कुठलीही सुविधा नव्हती, हा प्रकार आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या निदर्शनास आला.

Conducted a surprise inspection at the Vaccination centre in Asilo Hospital, Mapusa to take stock of the arrangements.
Goa Election: तृणमूल कॉंग्रेसही गोव्याच्या राजकीय रिंगणात

लहान मुलांना लस घेण्यासाठी येणाऱ्या पालकांच्‍या रांगा मुख्य रस्‍त्‍यापर्यंत पोहोचल्या होत्या. गर्दी होत असली, तरीही कर्मचारी संथगतीने लहान मुलांना लस दिली जात होती. त्यामुळे आरोग्यमंत्री राणे नाराज झाले. त्यानी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. लहान मुलांना ताटकळत ठेवू नका, अन्यथा कारवाई केली जाईल असे सांगितले. लहान मुलांच्या पालकांना रांगेत उभे राहण्यासाठी मंडप उभारा, तसेच खुर्च्यांची व्‍यवस्‍था करा, असेही आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

Conducted a surprise inspection at the Vaccination centre in Asilo Hospital, Mapusa to take stock of the arrangements.
Goa सरकारचे लक्ष निवडणुकीकडे, कोरोना रुग्णांची संख्या हजाराकडे!

ताटकळत ठेवू नका

आरोग्‍य केंद्रात लसीकरणावेळी विशेष अशी काहीच व्‍यवस्‍था केली नव्‍हती. गर्दी होत असली तरीही काम संथगतीने सुरू होते. त्‍यामुळे रांगा रस्‍त्‍यापर्यंत पोहोचल्‍या होत्‍या. त्‍यात ऊन, पाऊस असल्‍याने निवारा कुठे घ्‍यायचा, असा प्रश्‍‍न पडत होता. लसीकरणाला आलेल्‍यांना ताटकळत ठेवू नका, असे स्‍पष्‍ट निर्देश आरोग्‍यमंत्र्यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com