गोवा: साखळीतील राजकारणासाठी भाजपचे 'सुपर मुख्यमंत्री' जबाबदार का?: अमरनाथ पणजीकर

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 20 एप्रिल 2021

भाजपाचे "सुपर मुख्यमंत्री" स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रस घेत असल्याचे दिसून येत आहे.

पणजी: आगामी 2022 च्या विधानसभा निवडणुका कॉंग्रेसच जिंकणार याची पूर्ण जाणीव झाल्यानंतर,  भाजपाचे "सुपर मुख्यमंत्री" स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रस घेत असल्याचे दिसून येत आहे.  साखळी येथील पालिका आपल्या हाताखाली ठेवण्यासाठी भाजपाने सध्या  त्यांचे 'जुमला' डावपेच सुरु केले आहेत असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केले आहेत.
 
साखळी पालिकेतील राजकारणासाठी भाजपाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दोष देवू नये असे विधान मावळते नगराध्यक्ष यशवंत माडकर यांनी केले होते. त्यांना प्रतिउत्तर देताना  पणजीकर म्हणाले की, या परिस्थितीसाठी भाजपचे "सुपर मुख्यमंत्री" जबाबदार का हे माडकरांनी लोकांना सांगावे "कॉंग्रेसने पाठिंबा दिलेल्या नगरसेवकांना अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापासून दूर ठेवण्यासाठी भाजपच्या सुपर मुख्यमंत्र्यांनीच  हेरफेर करुन घाणेरड्या युक्त्या आजमावल्या काय" असा प्रश्न पणजीकर यांनी केला. काही नगरसेवक अवैध कामात सामील आहेत, असा आरोप नगरसेवक यशवंत मडकर यांनी केला होता, तो फेटाळताना पणजीकर म्हणाले की, अशा प्रकरणांमध्ये जर कोणी सामील असेल तर कायद्यानुसार कारवाई करता येते. तेथे दंडेलशाही वापरण्याची गरज नाही.( Goa Why is BJPs Super Chief Minister responsible for chain politics  Amarnath Panajikar)

गोवा: अपात्र आमदारांची याचिका फेटाळल्यानंतर 'ये तो होना ही था' म्हणत...

“भाजपाच्या कठपुतळ्यांनी आधी त्यांच्या नेत्यांकडून त्यांच्याच नेत्यांची प्रकरणे कशी लपवायची किंवा त्यांचे पाप धुवून  कसे काढावे  ते शिकले पाहिजे. आमदारांना चोरुन नेवून सत्ता काबीज करणे हे भाजपसाठी सोपे काम असू शकते, परंतु त्यांच्याच कॅडरला ‘कायदा’ शिकवणे आणि त्याचा आदर करणे सोपे नाही. ” असे पणजीकर म्हणाले.
 
“जेव्हा भाजपला हे कळते की त्यांनी  साखळी पालिका गमावली आहे, तेव्हा विरोधकांना सत्ता मिळवू नये म्हणून सर्व  प्रक्रिया लांबणीवर टाकली जाते, आणि जर  दुसर्‍या कुठल्याही पालिकेत हेराफेरी करुन सत्ता मिळवता येते तर तीच प्रक्रिया लवकर केली जाते. गोमंतकीयांना आता भाजपच्या या सर्व युक्त्यांबद्दल माहिती झाली आहे आणि म्हणूनच आगामी काळात त्यांना धडा शिकविला जाईल." असे पणजीकर म्हणाले. 
 
ते म्हणाले की, डॉ. प्रमोद सावंत अकार्यक्षम असल्यामुळे सरकार चालवू शकत नाहीत, म्हणूनच कॉंग्रेसचे हे म्हणणे आहे की ते सरकार  भाजपाच्या “सुपर पॉवर” द्वारे चालवित आहेत. "सुपर मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद सावंत आमदार चोरण्याचे व हेराफेरी करण्याचे उत्तम काम करत असल्याचे लोक बोलत आहेत." असे पणजीकर म्हणाले.

संबंधित बातम्या