Free Water: गोव्यातील 80 हजार घरांना आजपासून मिळणार मोफत पाणी

प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पुरवणारे गोवा पहिले राज्य ठरण्यासाठी सरकारचे प्रयत्न
Free Water: गोव्यातील 80 हजार घरांना आजपासून मिळणार मोफत पाणी
Goa CM Pramod SawantDainik Gomantak

पणजी: लोकांना मोफत पाणी (Free Water) देणारे गोवा (Goa) हे देशातील पहिले राज्य असेल असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Prmaod SAwant) यांनी काल केले. राज्यातील एक लाख 80 हजार घरांना आजपासून मासिक 16 हजार लीटर पाणी मोफत दिले जाणार आहे. 15ऑगस्टला केलेल्या भाषणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याची घोषणा केली होती. आज राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी पाणी वाचवा व पाणी मिळवा या मोहिमेची सुरवात करा, असे आवाहन केले.

राज्यभरात पाणीपुरवठा करण्यात येणारी सुमारे तीन लाख घरे आहेत. त्यापैकी किमान 60 टक्के घरांना या योजनेचा लाभ मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. ते म्हणाले, मोफत पाणी मिळते म्हणून पाण्याची नासाडी करू नये. पाणी जपून वापरले पाहिजे. प्रत्येकाने पाणी जबाबदारीने वापरल्यास तुटवड्यामुळे ज्यांच्यापर्यंत पाणी पोचत नाही त्यांना पाणी पुरवता येणार आहे. यासाठी पाणी वाचवा, पाणी मिळवा ही मोहीम सुरू करण्याचे सर्वांना आवाहन आहे.

Goa CM Pramod Sawant
Goa : अंगणवाडी सेविकांचे कार्य अतुलनीय

त्यांनी सांगितले, की अर्थसंकल्पात पाण्याचे बिल कमी करण्याचे नमूद केले होते. त्यानंतर आता पाण्याचे शून्य बिल, शून्य मीटर भाडे, तसेच ज्या घरांना मलनिस्सारण वाहिनीचा जोड आहे त्याचेही शुन्य बिल दिले जाणार आहे. त्यांनी नमूद केले हे छोटे उद्योजक, रेस्टॉरंटसाठी यापूर्वी औद्योगिक दराने पाणी बिल आकारले जात होते. यापुढे आता त्यांना वाणिज्यिक दराने पाणी बिल दिले जाणार आहे. यामुळे त्यांच्या पाणी बिलात कपात होऊन त्यांचा नफा वाढणार आहे.

Goa CM Pramod Sawant
Goa: बोरीतील वाहतूक बेटांचा आकार घटवावा

याशिवाय एकरकमी थकीत पाणी बिल योजनेस आणखीन दोन महिन्यांची मुदतवाढ दिली जात आहे. प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पुरवणारे पहिले राज्य ठरण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. त्यात सर्वांची साथ हवी.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com