'गोव्यात लॉजिस्टिक हब सुरू करून पर्यावरण पूरक रोजगार निर्मितीवर भर देणार '

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

व्यात लॉजिस्टिक हब सुरू करून पर्यावरण पूरक रोजगार निर्मितीवर भर देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी स्वंयरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले होते ते यशस्वी ठरले आहे त्याच धर्तीवर गोव्यातील महिलांनाही हे प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर केले जाईल असे मनोगत माजी केंद्रीयमंत्री व खासदार सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं. 

पणजी :  गोव्यात लॉजिस्टिक हब सुरू करून पर्यावरण पूरक रोजगार निर्मितीवर भर देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी स्वंयरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले होते ते यशस्वी ठरले आहे त्याच धर्तीवर गोव्यातील महिलांनाही हे प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर केले जाईल असे मनोगत माजी केंद्रीयमंत्री व खासदार सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं. सुरेश प्रभू काल गोवा भेटीवर आले असून ते आठवडाभर गोव्यात असतील. या भेटीवेळी त्यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना पुढे ते म्हणाले की, बदलता भारत ही पंतप्रधानांची संकल्पना भाजप देशातील प्रत्येक राज्यामध्ये पोचविणार आहे. केंद्र सरकारने शेतकरी, मच्छिमारी, महिला तसेच तरुणांसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे भाजप पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे की केंद्राच्या या योजनांचा संदेश गोव्यातील सर्व घटकांना व सामान्यांना पोहचवण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. 

गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची या पदासाठी निवड झाल्यानंतर मी गोव्यात आलो नव्हतो व त्यांची भेटही झाली नव्हती. पक्षाच्या आगामी कार्यक्रमाबाबत चर्चा करणार आहे. गोव्याच्या विकासामध्ये सर्वसामन्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मी केंद्रीय वाणिज्यमंत्री असताना गोव्यात लॉजिस्टिक हब संदर्भात विचार केला होता. त्यामुळे पर्यटनात वाढ होईल व पर्यावरण ऱ्हास होणार नाही, असे ते म्हणाले. राज्यातील खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्‍वासन दिले होते मात्र अजूनही गोव्यातील खाणी सुरू झालेल्या नाहीत यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री त्यासाठी समर्थ आहेत. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारने केलेल्या विकासाच्या जोरावर बहुमताने निवडून येईल त्यात कोणतीच शंका नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले.

‘चिपी’ जानेवारीपासून सुरू

 कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळ पुढीलवर्षी जानेवारी महिन्यात सुरू होईल, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज पणजी येथे दिली. दरम्यान, या ''चिपी''मुळे मोपा विमानतळावर परिणाम होऊ शकतो, असे मत अनेकांनी याआधी व्यक्त केले होते.

संबंधित बातम्या