राज्यात लवकरच ३ लाख कोविड चाचण्या पूर्ण होणार

राज्यात लवकरच ३ लाख कोविड चाचण्या पूर्ण होणार
goa will complete 3 lakh covid testings soon

पणजी- पुढच्या वीस ते बावीस दिवसांत राज्यात एकूण तीन लाख कोरोना चाचण्यांचा आकडा पूर्ण केला जाणार आहे. राज्यात सध्या 2 लाख 83 हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या असून रोज होणाऱ्या चाचण्यांची सरासरी कमी असली तरी पुढील वीस ते बावीस दिवसांत तीन लाख चाचण्या पूर्ण होणार आहेत. इतक्या प्रमाणावर चाचण्या करणारे गोवा हे छोटय़ा राज्यांमधील एक महत्वपूर्ण राज्य ठरणार आहे.

  सबंध देशभरात सगळीकडेच आता कोविडच्या चाचण्या कमी करण्यात आल्या आहेत. ज्यांना कोविडची लक्षणे दिसून येत आहेत त्याच रूग्णांची कोविड चाचणी केली जाते. गोव्यात रोज सरासरी बाराशे कोविड चाचण्या केल्या जातात. सोमवारी मात्र चाचण्या कमी केल्या गेल्या. फक्त 742 एवढय़ाच चाचण्या सोमवारच्या चोवीस तासांत पार पडल्या. रविवारी 1 हजार 246 चाचण्या केल्या गेल्या.

गोव्याची एकूण लोकसंख्या पंधरा लाखांच्या पुढे आहे. अवघ्या सात ते साडेसात महिन्यांत तीन लाख चाचण्या होणे हे खूप महत्त्वाचे आहे. 17 सप्टेंबर्पयत राज्यात कोविड चाचण्यांचे एकूण प्रमाण 2 लाख 31 हजार 801 होते. दि. 30 सप्टेंबरला हे प्रमाण 2 लाख 54 हजार 801 इतके झाले. 7 ऑक्टोबरला कोविड चाचण्यांचे एकूण प्रमाण 2 लाख 65 हजार 959 झाले. त्यावेळी दिवसाला सोळाशे ते अठराशे चाचण्या केल्या जात होत्या. दि. 12 ऑक्टोबरला एकूण कोविड चाचण्यांचे प्रमाण 2 लाख 73 हजार 404 पर्यंत गेले.  
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com