गोव्या जगातील सर्वात सुरक्षित पर्यटन स्थळांपैकी एक बनवण्यावर लक्ष केंद्रित करणार

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

काही लोकांची गोव्यातील पर्यटक, विशेषत: परदेशी लोक असुरक्षित असल्याची समजूत आहे, याच पार्श्वभूमीवर गोवा पर्यटन धोरण २०२० अंतर्गत गोव्याला जगातील सर्वात सुरक्षित पर्यटन स्थळांपैकी एक बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

 

पणजी : काही लोकांची गोव्यातील पर्यटक, विशेषत: परदेशी लोक असुरक्षित असल्याची समजूत आहे, याच पार्श्वभूमीवर गोवा पर्यटन धोरण २०२० अंतर्गत गोव्याला जगातील सर्वात सुरक्षित पर्यटन स्थळांपैकी एक बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या धोरणानुसार राज्याच्या पर्यटन क्षेत्रांमध्ये विविधता आणण्याचा मानस आहे.  तसेच राज्याची ओळख सांस्कृतिक आणि वारसा असलेले पर्यटन स्थळ म्हणून निर्माण करण्यावरदेखील लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. राज्यात विवाह पर्यटनासाठी तसेच परिषद आणि प्रदर्शने आयोजित करता यावी यासाठी पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यावरदेखील भर असेल. 

नव्या धोराणात राज्यातील पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाला महत्त्व दिले गेले आहे, ज्याने गेल्या दशकभरात पर्यटकांवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. समुद्रकिनारा आणि नाईटलाइफ पर्यटनासाठी अग्रगण्य ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या राज्याला परदेशी पर्यटकांवर व पर्यटकांकडून होणाऱ्या गुन्ह्यांच्या यादीत नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने चौथ्या क्रमांकावर ठेवले आहे.

मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या गोव्यातील खंडपीठाने अवघ्या एका दशकातच 245 परदेशी लोकांच्या मृत्यू प्रकरणात दुर्लक्ष केल्याबद्दल गोवा पोलिसांविरूद्ध कठोर ताशेरे देखील ओढले आहेत.

संबंधित बातम्या