Goa Oxygen Crisis: गोव्याला मिळणार रोज एक ऑक्सिजन टँकर

oxygen tanker
oxygen tanker

सुप्रीम कोर्ट (Supreme Court), हायकोर्टाचे वेगवेगळे फटकार आणि सरकारचे दावे असूनही ऑक्सिजनच्या (Oxygen) अभावामुळे मृत्यूचे सत्र गोव्यात सुरूच होते. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्याला रोज एक ऑक्सिजन टँकर देणार असल्याचे ट्विट केले आहे. काही दिवसांपूर्वी गोव्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Goa Medical College) 26 कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) त्यावेळी म्हणाले होते की, मृत्यू मंगळवारी पहाटे झाले होते. तसेच राणे यांनी या घटनेची उच्च न्यायालयात चौकशी करण्याची मागणी देखील केली होती. गोव्यातील मुंबई हायकोर्टाच्या (Bombay High Court) खंडपीठाने गोव्यातील अव्वल रुग्णालय, गोवा मेडिकल कॉलेज येथे ऑक्सिजन उपलब्धतेच्या कथित कमतरतेची चौकशी केली पाहिजे आणि न्यायालयाने आरोग्यासंदर्भात कोविडचे व्यवस्थापन आपल्या हातात घ्यावे, असे आरोग्यमंत्री राणे म्हटले होते.(Goa will get one oxygen tanker every day)

गोव्यातील ऑक्सिजनची वाढती मागणी पाहता रोज एक ऑक्सिजन टँकर देणार असल्याचे नितीन गडकरी यांच्या ऑफिस ऑफ नितीन गडकरी या ऑफिशियल अकाउंटवरुं ट्विट केले आहे. गोव्यात काल 2,865 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. तसेच 2,840 कोरोना रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. तर 70 रुग्णांना  कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.  

गोवा वैद्यकीय महाविद्यालय(Goa Medical College)इस्पितळातील काही कोरोनाग्रस्त रुग्णांचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाल्याने त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने(Goa Bench Bombay High Court) आज गोवा सरकारला(goa government) जनहित याचिकांवरील सुनावणीवेळी चांगलेच धारेवर चांगलेच धरले. घटनेतील कलम 21 नुसार प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com