गोवा माईल्स रद्द करणार नाहीच : माविन गुदिन्हो

दैनिक गोमंतक
गुरुवार, 8 एप्रिल 2021

पणजी : गोवा हे जागतिक पर्यटन केंद्र आहे आणि राज्यातील टॅक्सीचालक हे पर्यटन दूत आहेत. गोव्यातील टॅक्सी व्यवसाय गोमंतकियांनी सांभाळून ठेवला आहे. त्यामुळे गोवा सरकार त्यांचे हित नक्कीच जपते.

पणजी : गोवा हे जागतिक पर्यटन केंद्र आहे आणि राज्यातील टॅक्सीचालक हे पर्यटन दूत आहेत. गोव्यातील टॅक्सी व्यवसाय गोमंतकियांनी सांभाळून ठेवला आहे. त्यामुळे गोवा सरकार त्यांचे हित नक्कीच जपते. त्यांना करमाफी व इतर माध्‍यमातून 34  कोटींचे सहाय्य त्याचसाठी केले जात आहे. येत्या काळात राज्यातील टॅक्सींचे दरही वाढवले जातील. मात्र, गोवा माईल्स रद्द केली जाणार नाही, अशी माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.  (Goa will not cancel Miles: Mavin Gudinho)

पर्वरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री गुदिन्हो म्हणाले, सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे, नव्या तंत्रज्ञानाचे आहे. टॅक्सीचालकांनीही बदलायला हवे. गोमंतकीय टॅक्सीचालकांचे हित जपण्यासाठी व त्यांच्या मागणीनुसार ‘उबेर’ व ‘ओला’ या टॅक्सीसेवांना सरकारने गोव्यात परवानगी दिली नाही. आता ‘अपना भाडा’ यालाही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे टॅक्सीचालकांनी सरकारवर टीका करत आंदोलन करणे अयोग्य असल्याचे सांगून काही झाले तरी पर्यटकांच्या पसंतीला उतरलेली गोवा माईल्स सेवा बंद करणार नाही, असा इशाराच यावेळी गुदिन्हो यांनी दिला. 

फोंडा आणि पर्वरीत रुग्णसंख्येने गाठला उच्चांक!

इंधनचे दर वाढत आहेत, टॅक्सीदरात 2014 नंतर वाढ झालेली नाही. लवकरच रस्ता सुरक्षा प्रधिकरणाची बैठक घेऊन टॅक्सी दरवाढीवर विचार केला जाणार असल्याचे सांगून येत्या दोन महिन्यात राज्यातील सर्व पर्यटक टॅक्सींना सरकारी खर्चाने डिजीटल मीटर बसवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूकमंत्र्यांनी यावेळी दिली. मिटर बसवण्यासाठी टॅक्सीचालकांना सहा महिन्यांची वेळ देण्यात येणार आहे. टॅक्सीचालकांनी धमक्या देऊन किवा कायदा हातात घेण्याची धमकी देऊन सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही यावेळी गुदिन्‍हो यांनी दिला. 

आता गोव्यात फिल्म शुटिंगसाठी घ्यावी लागणार परवानगी

खासगी बसेस चालवण्यास घेणार!
राज्यातील खासगी बसेस कदंब चालवण्यास घेण्याचा विचार करत आहे. कदंबचा वाहक व बसमालकाचा चालक, अशी ही सेवा असेल. खासगी बसमालकांना किलोमीटरनुसार रक्कम दिली जाईल. ज्यामुळे त्यांना फायदा होईल, असे वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या