राज्यात पुन्हा टाळेबंदी नाही; तो मेसेज चुकीचा: मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

सध्या सर्व काही सुरळीत सुरू आहे. अशा चुकीच्‍या व्हायरल मेसेजकडे लोकांनी दुर्लक्ष करावे. असा चुकीच्या मेसेज कोणीही पुढे कोणाला पाठवू नयेत. गोव्यातील लोक सूज्ञ आहेत व ते सरकारी अधिकृत माहितीवर विश्‍वास ठेवतात. त्यामुळे अशा मेसेजना गोव्यातील जनता बळी पडणार नाही व कोणी बळी पडू नये.

पणजी: राज्यात टाळेबंदीची शक्यता असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करणारा मूर्ख असावा. सध्या अनलॉक सुरू असताना कोणतीही टाळेबंदी नाही. जर टाळेबंदी करायची असल्यास सरकार त्याची अधिकृत पूर्वकल्पना देऊन घोषणा करील. चुकीची माहिती व्हायरल करण्यात आली आहे. त्याची चौकशी करण्यास पोलिसांना आदेश देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 

सध्या राज्यात कोविड महामारी सुरू असल्याने काहीजणांना अशाप्रकारे चुकीची माहिती देणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून लोकांमध्ये भिती व तणाव निर्माण करायचा असतो. सध्या सर्व काही सुरळीत सुरू आहे. अशा चुकीच्‍या व्हायरल मेसेजकडे लोकांनी दुर्लक्ष करावे. असा चुकीच्या मेसेज कोणीही पुढे कोणाला पाठवू नयेत. गोव्यातील लोक सूज्ञ आहेत व ते सरकारी अधिकृत माहितीवर विश्‍वास ठेवतात. त्यामुळे अशा मेसेजना गोव्यातील जनता बळी पडणार नाही व कोणी बळी पडू नये. ‘कोविड’ महामारीसंदर्भात काही चांगल्या उपयोगी गोष्टी असल्यास त्या सोशल मीडियावर मेसेजने पाठवाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या