महिलांनी स्वावलंबी बनण्यासाठी पुढे यावे; रश्मी कोरगावकर

महिलांच्या उन्नतीसाठी मिशन फॉर लोकलचे महिला मंच कार्यरत असणार असल्याची ग्वाही मंचच्या अध्यक्षा रश्मी राजन कोरगावकर यांनी देताना महिलांनी स्वावलंबी होण्याचे आवाहन केले.
महिलांनी स्वावलंबी बनण्यासाठी पुढे यावे; रश्मी कोरगावकर
सरपंच गेन्सी फर्नांडीस यांनी बोलताना मिशन फॉर लोकलचे उपक्रम महिलांना स्वावलंबी बनवण्यास मदत होणार आहे. महिलांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.Dainik Gomantak

मोरजी : महिलांच्या (Women) उन्नतीसाठी मिशन फॉर लोकलचे महिला मंच कार्यरत असणार असल्याची ग्वाही मंचच्या अध्यक्षा रश्मी राजन कोरगावकर (Rashmi Korgaonkar) यांनी देताना महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी आणि आपल्या घरसंसाराला हातभार लावण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षणात सहभागी होवून स्वताचा व्यवसाय करावा असे आवाहन रश्मी कोरगावकर यांनी न्हयबाग पोरस्कडे पंचायत सभागृहात महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यशाळा, विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचे बक्षीस वितरण आणि प्रमाणपत्रे व महिला ग्रुप साठी व्यवसाय करण्यासाठी साहित्य वितरीत केल्यानंतर बोलत होत्या.

सरपंच गेन्सी फर्नांडीस यांनी बोलताना मिशन फॉर लोकलचे उपक्रम महिलांना स्वावलंबी बनवण्यास मदत होणार आहे. महिलांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
मोर्ले सत्तरीतील स्वच्छतेसाठी 'त्या' चार जणींचे योगदान महत्त्वाचे
यावेळी केक बनवणे, वस्त्र तयार करणे, वेशभूषा व इतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यांना बक्षिसे व सहभागी महिला आणि युवतीला प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी केक बनवणे, वस्त्र तयार करणे, वेशभूषा व इतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यांना बक्षिसे व सहभागी महिला आणि युवतीला प्रमाणपत्र देण्यात आले.Dainik Gomantak

यावेळी सरपंच गेन्सी फर्नांडीस, सुधा कोरगावकर, सत्यभामा पेडणेकर आदी उपस्थित होते. स्वागत सूत्रसंचालन सोनल पीलर्णकर यांनी केले. तर देवयानी गवंडी, मनाली गडेकर, दिशा नागवेकर विनिशा गडेकर, वैष्णवी कलंगुटकर शुभांगी हळर्णकर आदींनी पाहुण्याचे पुष्प देवून स्वागत केले. सुरुवातीला महिलांनी प्रार्थना करून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी रश्मी कोरगावकर यांनी पुढे बोलताना महिला दिवसेंदिवस प्रगती करत आहे. ग्रामीण भागात आर्थिक चणचण असल्याने महिला व युवतीला मनात इच्छा असूनही विविध प्रकारचे प्रशिक्षणे घेता येत नाही.

सरपंच गेन्सी फर्नांडीस यांनी बोलताना मिशन फॉर लोकलचे उपक्रम महिलांना स्वावलंबी बनवण्यास मदत होणार आहे. महिलांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
क्रीडा खात्यातर्फे स्वच्छता मोहिमेचे आयोजन
कार्यक्रमाला उपस्थित महिला
कार्यक्रमाला उपस्थित महिला Dainik Gomantak

अश्या इच्छुक महिला व युवतीला वेगवेगळा व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जातील, महिलांचे प्रत्येक प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी महिला मंच कार्यरत आहे, आणि मिशन फॉर लोकलच्या उपक्रमाचा जास्तीतजास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.यावेळी केक बनवणे, वस्त्र तयार करणे, वेशभूषा व इतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याना बक्षिसे व सहभागी महिला आणि युवतीला प्रमाणपत्र देण्यात आले. दरम्यान सरपंच गेन्सी फर्नांडीस यांनी बोलताना मिशन फॉर लोकलचे उपक्रम महिलांना स्वावलंबी बनवण्यास मदत होणार आहे. महिलांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

Related Stories

No stories found.