जीसीसीआय महिला विंग आणि मेवो यांच्यात करार

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

कोरोनासारख्या साथीच्या रोगाच्या कालावधीतसुद्धा कंपनीचे काम दिमाखात सुरू आहे. सध्या गोव्यात यूएसए, नेदरलँड आणि जर्मनीसारख्या ठिकाणाहून काम येत आहे. भविष्यात आम्हाला राज्यात महिला उद्योजकांची संख्या वाढलेली असल्याचे मत धेंपो समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी व्यक्त केले. 

पणजी : मेवो या कंपनीने राज्यात काम सुरू करून एक वर्ष झाले आणि या एका वर्षात राज्यात अनेक स्टार्टअपना या कंपनीने मदत केली आहे. शिवाय कोरोनासारख्या साथीच्या रोगाच्या कालावधीतसुद्धा कंपनीचे काम दिमाखात सुरू आहे. सध्या गोव्यात यूएसए, नेदरलँड आणि जर्मनीसारख्या ठिकाणाहून काम येत आहे. भविष्यात आम्हाला राज्यात महिला उद्योजकांची संख्या वाढलेली असल्याचे मत धेंपो समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी व्यक्त केले. 

नुकतेच एक वर्ष पूर्ण केलेल्या मेवो या कंपनीच्या वर्धापनदिनी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उद्योजक मनोज काकुलो, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (जीसीसीआय) महिला विंगच्या अध्यक्ष पल्लवी साळगावकर, मेवोचे संस्थापक अबरार शेख आदी उपस्थित होते. 
या कार्यक्रमात जीसीसीआय - महिला विंग आणि मेवो यांच्यात महिला उद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. 

यावेळी पल्लवी साळगावकर यांनी आभार मानले आणि राज्यात महिला उद्योजकांनी पुढे येऊन स्वतःच्या उद्योगाला मोठे करण्यासाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठीचे आवाहन केले. 
मेवो यांच्यामुळे राज्यातील तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. आम्ही जीसीसीआयच्या माध्यमातून मेवो यांच्यासोबत केलेल्या सामंजस्य करारामुळे खूप खुश आहोत. राज्याला पुढे नेण्यासाठी आणि वेगवेगळ्या उद्योजिकतेच्या व्यासपीठावर एकमेकांना आधार देण्यासाठी आपण एकत्र राहूया, असे यावेळी मनोज काकुलो म्हणाले.

संबंधित बातम्या