गोवा: मजुरांची गोव्यातच राहण्यास पसंती - देश प्रभुदेसाई

Goa Workers prefer to stay in Goa  Desh Prabhudesai
Goa Workers prefer to stay in Goa Desh Prabhudesai

मडगाव : गोव्यात कोविड स्थिती गंभीर होत असली तरी बांधकाम व्यवसायाशी निगडीत मजूर वर्गाने अध्याप गोव्यात राहणेच पसंत केले असून लाॅकडाऊन काळातही हे मजूर गोव्यातच राहण्याची शक्यता बांधकाम व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. वर्षभरापूर्वी लाॅकडाऊन झाल्यानंतर गोव्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आपल्या गावी परतले होते. त्यामुळे बांधकाम, हाॅटेल व इतर व्यवसायांना फटका बसला होता. (Goa Workers prefer to stay in Goa  Desh Prabhudesai)

तथापि, या खेपेस मजुरांनी गोव्यातच राहणे पसंत केले आहे, असे बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाय संघटनेचे माजी अध्यक्ष डाॅ. देश प्रभुदेसाई (Desh Prabhudesai) यांनी सांगितले. गावी परत गेल्यास तिथेही आबाळ होते, हे या मजुरांना कळून चुकले आहे. गोव्यातील लाॅकडाऊन तीन दिवसांसाठी आहे. शिवाय लाॅकडाऊनमध्ये बांधकाम व्यवसायावर निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मागच्या प्रमाणे या खेपेस बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसणार नाही, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले. 

गर्दी नियमित, लाॅकडाऊनमुळे नाही - घाटगे

मडगाव रेल्वे स्थानकावर आज झालेली गर्दी ही नियमित होती, ही गर्दी लाॅकाडाऊन जाहीर झाल्याने नव्हे असे कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक बबन घाटगे यांनी स्पष्ट केले.  आज रेल्वे स्थानकावर आलेले प्रवासी हे पटना एक्स्प्रेसचे होते. या रेल्वेच्या प्रवाशांनी आधीच तिकीट आरक्षीत केले होते.  या रेल्वेला जनरल डबे नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com