गोवा: राज्यात साडेचारशे कोटींचे कामे सुरु- आमदार दयानंद सोपटे

SAPATE 1.jpg
SAPATE 1.jpg

राज्यात गोवा पर्यटन विकास महामंडळ (Goa Tourism Development Corporation) मार्फत साडे चारशे कोटींची कामे सुरु आहेत. आपण चेरमेन पद स्वीकारल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या सहकार्यातून विकासाला पाठबळ मिळत आहे असे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळ चेरमेन दयानंद सोपटे (Dayanand Sopte) यांनी विर्नोडा पंचायत क्षेत्रात वन महोत्सव (Forest Festival) साजरा करताना सांगितले. 24 रोजी विर्नोडा पंचायत क्षेत्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला वनाधिकारी संतोष फडते  मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष मधु परब , विर्नोडा सरपंच मंगलदास किनळेकर ,उपसरपंच अनुपा परब ,पंच शैलेंद्र परब , माजी सरपंच प्रशांत राव , पंच अनुपा कांबळी , देवस्थान अध्यक्ष उमेश परब व इतर उपस्थित होते .

आमदार दयानंद सोपटे सरपंच मंगलदास किनळेकर आदीच्या हस्ते मंदिर परिसरात झाडे लावून वनमहोत्सव साजरा करण्यात आला .यावेळी आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना झाडांचे महत्व प्रत्येकाच्या जीवनाशी जवळचा संबध आहे , सरकार दरवर्षी वनखात्यातर्फे झाडे वितरीत केली जातात त्या झाडांची योग्य ती काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी असे सांगितले. (Goa Works worth Rs 450 crore started in the state MLA Dayanand Sopte)

पर्यटन महामंडळा मार्फत विकास
आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना पर्यटन महामंडळा मार्फत राज्यात आणि पर्यायाने पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात मंदिर परिसर सुशोभीकरणाची कामे जोरात चालू आहे . उर्वरित कामासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com