Subhash Shirodkar: अमित शाह हे राष्ट्रीय नेते, ते म्हादईबाबत गोव्याच्या हितार्थच निर्णय घेतील

म्हादई प्रश्नाबद्दल भाजप भूमिकेविषयी सुभाष शिरोडकर यांची सारवासारव
Subhash Shirodkar on Amit Shah
Subhash Shirodkar on Amit ShahDainik Gomantak

Subhash Shirodkar on Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरीष्ठ नेते अमित शाह हे गोव्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपची म्हादई पाणी वाटप संदर्भातील भूमिका काय असा प्रश्न सध्या गोव्यात उपस्थित झालेला असताना जलस्त्रोत मंत्री आणि म्हादई संदर्भातील विधानसभा समितीचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी, शहा हे राष्ट्रीय नेते असून ते गोव्याच्या हितार्थच निर्णय घेतील अशी सारवासारव त्यांनी केली.

Subhash Shirodkar on Amit Shah
Goa Recruitment: नोकरभरतीची जाहिरात आली 2019 मध्ये; परीक्षेसाठी उजाडले 2023

दरम्यान, शिरोडकर आज फातोर्डा येथे एका जल संसाधन योजनेच्या शुभारंभास आले होते. त्यावेळी त्यांना हा प्रश्र्न विचारला असता, त्यांनी वरील उत्तर दिले. म्हादई प्रश्न काय याची शहा यांना माहिती आहे. ते या प्रश्नांवर योग्य तो तोडगा काढतील असे शिरोडकर यांनी सांगितले.

या मुद्द्यावर उद्या तुम्ही शहा यांच्याकडे बोलणार का असे त्यांना विचारले असता, नक्कीच असे उत्तर त्यांनी दिले. यापूर्वीही आम्ही यासंबंधी त्यांच्याकडे बोललो आहोत. उद्याही बोलू असे त्यांनी सांगितले.

शुक्रवारी बोलताना शिरोडकर यांनी गृहमंत्री शाह म्हादईबाबत काय बोलतात पाहू, त्यानंतर पुढचे पुढे पाहू. ते आपले पाहुणे आहेत, त्यांचे आदरातिथ्य करणे गरजेचे आहे, असे वक्तव्य केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com