सावधान! लष्कर, रेल्वे भरतीसाठी आमिष दाखवुन गोमंतकीय तरुणांची फसवणुक केल्याचा संशय

Employment.jpg
Employment.jpg

पणजी: लष्करात(Army), तसेच रेल्वेमध्ये (Railway) भरती (Recruitment) करण्यासाठी चौघांकडून तब्बल साडेतेरा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे-मुंडवा (Pune)पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे परिसरात झालेल्या या फसवणुकीला गोमंतकीय (goa) तरुण-तरुणीही बळी पडल्या असाव्यात, असा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे.(Goa youth cheated by lure for army, railway recruitment)

भारत कृष्णा काटे, राजेंद्र दिनकर संकपाळ, दयानंद जाधव आणि बी. के. सिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सलमान गौसुउद्दीन शेख यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींवर गुन्ह्याचा कट रचून बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट कागदपत्रे उपयोगात आणणे, तसेच आयटी अ‍ॅक्टच्या विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल केलेला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2020 मध्ये देशातील वेगवेगळ्या ठिकाणी घडला.त्यात गोव्यातील नोकरीस इच्छुकांचा समावेश असावा, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.  आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादी शिवाजी जाधव आणि नवनाथ जाधव यांना लष्करामध्ये भरती करण्यासाठी 6 लाख रुपयांची मागणी केली. तसेच फिर्यादीचा भाऊ सोहेल शेख याला रेल्वेमध्ये तिकीट चेकर म्हणून भरती करण्यासाठी सात लाख रुपयांची मागणी केली.    

तेजपाल प्रकरणात: गोवा खंडपीठाने बजावली नोटीस                                     बनावट नियुक्ती पत्रे                                                                                      संबंधितांची खरोखरच भरती केली जात असल्याचे भासविण्यासाठी त्यांना वेळोवेळी दिल्ली, झांसी, रांची, लखनौ, जबलपूर येथे बोलावून घेतले. तसेच पुण्यातील घोरपडी येथील आर्मी ऑफिस समोरही आरोपींनी त्यांची भेट घेतली. दरम्यान, हेडकॉर्टरल आर्मी अशी बनावट वेबसाइट तयार करून तिचा गैरवापर करून चौघांकडून तब्बल साडेतेरा लाख रुपये घेतले. या दरम्यान आरोपींनी चौघांना बनावट नियुक्ती पत्र देऊन त्यांची फसवणूक केली.                                                                                            

गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता
लष्कर भरती प्रवेश परीक्षा पेपर प्रकरण उघडकीस आणत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्याप्रमाणे याही गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची व त्यात लष्कर आणि रेल्वेमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com