"ऑक्सिजन पुरविणाऱ्या कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा भाजप सरकारकडून छळ"

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 1 मे 2021

भाजप सरकारने कोविड रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांना प्राणवायूचे सिलिंडर पुरविणारे कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांची छळवणूक थांबवावी, असा इशारा गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे.

पणजी : पोलिस खाते आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कोविड रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांना ऑक्सिजनचे सिलिंडर पुरविणारे कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांची छळवणूक थांबवावी, असा इशारा गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे.(Goa Youth Congress activists provide oxygen cylinders to patients)

...तोपर्यंत अभ्‍यास सुरू ठेवा 

राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी त्रस्त कोविड रुग्णांचा जीव वाचावा म्हणून युवक काँग्रेसचे पदाधिकारी गरजूंना वैद्यकीय ऑक्सिजनचे सिलिंडर पुरवत आहेत. अशा स्वयंसेवी कार्यकर्त्यांना सहकार्य करायचे सोडून गोवा पोलिस त्यांचीच उलटतपासणी घेत आहेत, युवक काँग्रेस पदाधिकारी साईश आरोसकर हे ग्लेन काब्राल यांच्यासोबत ऑक्सिजन सिलिंडर वाहून नेत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई करायला सुरुवात केली आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस सरचिटणीस जनार्दन भंडारी, गोवा युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, सांतआंद्रे युवक गटाध्यक्ष साईश आरोसकर, युवक काँग्रेस सचिव ग्लेन काब्राल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी छळवणूक चालवली आहे. कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांना आगशी पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत.

गोव्यातील सरकारी कार्यालये 15 मे पर्यंत निर्बंधात 

एक पोलिस अधीक्षक, दोन उपअधीक्षक आणि एक पोलीस निरीक्षक एवढ्या अधिकाऱ्यांना कामाला लावून मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस स्वयंसेवकांना गरजूंची मदत करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न चालवला आहे, असे चोडणकर म्हणाले.

संबंधित बातम्या