Goa: गुरुपौर्णिमेनिमित्त नेहरू युवा केंद्रा तर्फे युवा गौरव सोहळा

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते गौरव (Will be felicitated by the Chief Minister) (Goa)
Logo of Neharu Yuva Kendra.(Goa)
Logo of Neharu Yuva Kendra.(Goa)Siddhesh Shirsat / Dainik Gomantak

नेहरू युवा केंद्रातर्फे (Neharu yuva Kendra) व इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा ()Instute Menezes Braganza) यांच्या संयुक्त विद्यमाने युवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रमउद्या (23 जुलै) संध्याकाळी साडेपाच वाजता पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा कॉन्फरन्स हॉल (Menezes Braganza conference hall) येथील संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त गुणाजी मांद्रेकर यांचा गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे (Will be felicitated by the Chief Minister). तसेच योग दिनाच्या दिवशी 24 तासात 3730 सूर्यनमस्कार घालून विक्रम केल्याबद्दल पंकज सायनेकर यांचाही गौरव केला जाईल याशिवाय डॉक्टर सर्वानंद सावंत देसाई, प्रेरणा पालेकर व तनवेश वेंगुर्लेकर यांचा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार केला जाईल. जिल्हास्तरीय उत्कृष्ट संस्था म्हणून शांतादुर्गा स्पोर्टस अंड कल्चरल क्लब, वेलिंग तर राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्काराने सर्वण डिचोली येथील सर्वंण फ्रेंड सर्कल स्पोर्टस अंड कल्चरल क्लब या संस्थांना सन्मानित करण्यात येईल. (Goa)

Logo of Neharu Yuva Kendra.(Goa)
Goa: राज्यपालांनी घेतले विद्याधिराज तीर्थ स्वामीजींच्या समाधीचे दर्शन

गुरुपौर्णिमे निमित्त डॉन बॉस्को समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर पंकज कुंभार यांचा गुणगौरव करण्यात येईल.या कार्यक्रमात इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे संस्थेचे चेअरमन दशरथ परब , नेहरू युवा केंद्रा संघटनेचे उपसंचालक कालिदास घाटवळ व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे .कार्यक्रमाची सुरुवात चारुदत्त गावस यांच्या यांच्या संवादिनी वादनाने होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com