झुआरी अपघाताची केवळ नोंद; पोलिस कृती मात्र शून्य

प्रशासनाला गांभीर्य नाहीच; दोन दिवसांत संबधित अधिकाऱ्यांकडून आढाव्याचीही बैठक नाही
Zuari Car Accident
Zuari Car AccidentDainik Gomantak

पणजी : राज्याला हादरून सोडलेल्या झुआरी पुलावरील दुर्घटनेसंदर्भात बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी आगशी पोलिसांनी अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली. पण घटनेला 48 तास उलटून गेले तरी याविषयी पोलिस आणि वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी साधी बैठक घेतली नाही. दुर्घटनेनंतर अशाप्रकारच्या अपघातांना रोखण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची या यंत्रणांकडून अपेक्षा होती. मात्र त्याचीही पूर्तता झाली नाही. विशेष म्हणजे शुक्रवारी झुआरी पुलानजिक ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’बाबत तपासणी केल्याचेही निदर्शणास आले नाही.

दुर्घटनेपूर्वी मृत्यू झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या जबान्या नोंदवण्यात आल्या आहेत. हा अपघात ब्रेक निकामी झाल्याने झाला आहे का याची तपासणी पोलिस करत आहेत. त्यांच्यासोबत गाडीने पणजीला जाण्यास नकार दिलेल्या हेल्टन फर्नांडिस आणि मृत झालेल्या कुटुंबियांच्या जबान्या पोलिसांनी नोंदविल्या असून मृतांचा व्हिसेरा नमुना राखून ठेवण्यात आल्याची माहिती आगशी पोलिसांनी दिली.

हा अपघात झुआरी पुलावर पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना झाला असल्याचे काहींनी पोलिसांना दिली आहे. त्याची पडताळणी करण्यात येत आहे. या वाहनाच्या पुढे कोणते वाहन होते याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, अजुनही काही ठोस माहिती मिळालेली नाही. मृत्यू झालेल्या प्रिसिला डिक्रूझच्या घरी तिचा पती अँथनी आरावजो तसेच इतरजण वाढदिवसाला उपस्थित होते. त्यामुळे या वाढदिवसाला उपस्थित राहिलेल्या त्यांच्या इतर नातेवाईकांच्याही जबान्या नोंदवण्यात आल्या आहेत. हे सर्व जण पणजीत पार्टीसाठी निघाले होते व रात्री उशिरा परतणार असल्याचे सांगितले असे चौकशीत पुढे आले आहे.

Zuari Car Accident
झुआरी अपघातामागे हलगर्जीपणा की बेसावधपणा?

कोसळण्यापूर्वी दाबले ब्रेक
झुआरी पुलावरून अपघाग्रस्त गाडी कठडा मोडून नदीत पडण्यापूर्वी तेथील रस्त्यावर ब्रेक मारल्याच्या खुणा आहेत. डावीकडून ही गाडी उजव्या बाजूला गेल्याचे या ब्रेकच्या खुणांवरून दिसून येत आहे. ब्रेक मारल्यानंतर ते निकामी झाले का याची तपासणी करण्यासाठी वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे.

निष्काळजीपणामुळे अपघात
हा अपघात प्रथमदर्शनी भरवेगाने वाहन चालवून झालेल्या निष्काळजीपणा व बेदरकारीमुळे झाला असल्याचे स्पष्ट होत आहे, मात्र या वाहनाने पुढील वाहनाला वाचवण्याचा प्रयत्न करताना तो झाला की ओव्हरटेक करताना झाला याची प्रत्यक्षदर्शनी माहिती देणारा साक्षीदार पुढे आलेला नाही. ओव्हरटेक करताना झाला असा अंदाज रस्त्यावरील वाहनाच्या चाकाच्या खुणांमुळे व्यक्त केला जात आहे. या सर्व पूर्तता तपासून पाहण्यात येत आहे.

अपघाताचा गुन्हा दाखल
मोटार वाहन कायद्याखाली अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदण्यासाठी वाहनातील सर्वांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन व सल्ल्यानुसार पुढील चौकशी करण्यात येणार असल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले.

सरकारसह प्रशासनाला गांभीर्य समजेना
झुआरी अपघातानंतर भरधाव वेगाने वाहन हाकल्याने वाहन चालकाचा निष्काळजीपणा व बेदरकार असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी कोणतेच उपायही सुचविले नाहीत. या पुलावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या पुलाच्या बाजूने पोलिसही ठेवण्याची तसदी घेण्यात आली नाही. सरकारनेही या अपघाताची गंभीरता न घेता त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com