भाजपाला घरी पाठवणे हेच ध्येय

The goal is to send the BJP home
The goal is to send the BJP home

म्हापसा : येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला घरी पाठवणे हेच आमचे ध्येय असून, त्याबाबत गोमंतकीय जनतेनेही ठाम निर्धार केलेला आहे, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे नवनियुक्त कार्याध्यक्ष तथा थिवी मतदारसंघाचे माजी भाजपा आमदार किरण कांदोळकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


ते पुढे म्हणाले, की आगामी निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षच निर्विवादपणे गोव्यात सत्तेवर येणार आहे. गोवा राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक राजकीय पक्षांना सत्तेवर आणणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून भाजपाच्या पाडावासाठी गोवा फॉरवर्ड पक्ष यापुढे पूर्ण ताकदीनिशी कार्यरत राहणार आहे; आणि तोच या पक्षाचा भावी काळासाठीचा संकल्प आहे. श्री. कांदोळकर म्हणाले, येणाऱ्या काळात या पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते त्या दृष्टीने कार्यरत राहणार आहेत. त्यासाठी आम्ही गावोगावी जाऊन जनजागृती करणार आहोत. पक्षसंघटनेकडेही त्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले जाणार आहे.


यदाकदाचित गोवा फॉरवर्ड पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही, तर सत्तास्थापनेसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सहकार्य तथा पाठिंबा घेण्याचा विचार आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना श्री. कांदोळकर म्हणाले, की येत्या निवडणुकीत आमच्या पक्षाला स्वबळावर गोव्यात पूर्ण बहुमत मिळेलच यांचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. परंतु, राजकारणात काहीही होऊ शकते. सत्तास्थापनेसाठी यदाकदाचित एक-दोन जागा कमी पडल्या तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासारख्या स्थानिक पक्षांचा अथवा अपक्ष आमदारांचा विचार अवश्य केला जाईल. तथापि, त्याबाबत परिस्थितीनुरूप निर्णय घेतला जाईल. त्यासंदर्भात आताच वक्तव्य करणे उचित ठरणार नाही. सध्या तरी आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरणार आहोत, एवढे मात्र निश्चित आहे, असेही श्री. कांदोळकर यांनी स्पष्ट केले.


मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भ्रष्ट कारभार करून गोव्याला विकून टाकल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी केला आहे, त्याबाबत आपण सहमत आहात का, असे विचारले असता, श्री. कांदोळकर म्हणाले की काँग्रेसमधून भाजपात आयात केलेल्या आमदारांमुळे भाजपा अधिक भ्रष्ट झाली आहे व त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे मी स्वत: तक्रारी केल्यानंतरही काहीच कारवाई झालेली नाही, हे तर जगजाहीर 
आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com