गोव्याचा नवाब शेख 'सूर नवा ध्यास नवा'च्या सुरेल सोळामध्ये

मेगा ऑडिशनमध्ये नवाबने 'प्रथम तुला वंदितो' हे गाणे गाऊन परीक्षकांची मने जिंकली होती.
Nawab Shaikh in Sur Nava Dhyas Nava
Nawab Shaikh in Sur Nava Dhyas NavaDainik Gomantak / Colors Marathi

वास्को : कलर्स मराठीच्या 'सूर नवा ध्यास नवा' या रिअॅलिटी शोच्या पाचव्या मोसमाची सुरुवात नुकतीच झाली आहे. या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर रविवार 24 जुलै रोजी संध्याकाळी झाला आहे. या मोसमातील सुरेल सोळामध्ये वास्को येथील नवाब शेख याची निवड झाली आहे. 1 जुलै रोजी झालेल्या मेगा ऑडिशनमध्ये नवाबने 'प्रथम तुला वंदितो' हे गाणे गाऊन परीक्षकांची मने जिंकली होती.

Nawab Shaikh in Sur Nava Dhyas Nava
मानवी हक्काच्या उल्लंघनातून एकोस्कर यांना ‘क्लीन चीट’

वास्को येथे वास्तव्यास असलेला नवाब गेली 10 वर्षे सडा येथील संगीत शिक्षक शरद मठकर यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. नवाब भजनी संगीतसुध्दा गातो. भावगीते, भक्तिगीते, अभंग-गवळण यावरही त्याचे प्रभुत्व आहे. त्याचे गुरु त्याच्याबद्दल कौतुकाने बोलताना म्हणतात, 'गायक म्हणून तो नक्कीच खूप प्रगती करू शकतो. गाण्याच्या बाबतीत तो खूप कष्ट घेणारा तर आहेच शिवाय तो स्वभावानेही अतिशय नम्र आहे.' नवाबने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला गायक म्हणून सिद्ध केले आहे. गायक म्हणून त्याच्या गुणांची 'ओळख आता आताच लोकांना होऊ लागली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून या रिअॅलिटी शोमध्ये भाग घ्यायला आलेल्या मुलांमधून 'शुटींग राऊंड' मध्येच चांगला परफॉर्मन्स देऊन नवाबने प्रथम पहिल्या पन्नासात स्थान मिळवले. त्यानंतर अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी जेव्हा त्याने 'प्रथम तुला वंदितो' हे गाणे गायले तेव्हा परीक्षक असलेल्या अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांनी त्याचे खूप कौतुक केले. गोव्याचा (अमराठी असलेला) आणि मुस्लिम असूनही भाषेवर असलेल्या त्याच्या प्रभुत्वाविषयी ते भरभरुन बोलले. नवाबचे उच्चारण, सूर तालाची समज याबद्दल त्यांनी फार कौतुक व्यक्त केले.

नवाबचे गुरू शरद मठकर हे पहिल्यापासूनच त्याच्या भाषेवर काम करत आले आहेत. गाण्यातील शब्दाचा अर्थ, त्यांचा भाव हे नवाबला समजावून देण्यात त्याच्या गुरूचा मोठा वाटा आहे. नवाब विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. सध्या तो आपला संपूर्ण वेळ संगीतासाठी देतो. यापूर्वी अखिल भारतीय स्तरावर झालेल्या हरिद्वार येथील गीत गायन स्पर्धेत तो विजेता ठरला होता. त्याला सुवर्णपदक प्राप्त झाले होते. कोविड काळात ऑनलाईन आयोजित झालेल्या राष्ट्रीय पातळीवरच्या गीतगायन स्पर्धेतही त्याने विजेतेपद मिळवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com