Goan Demands Mining: हॅशटॅगमार्फत गोवेकरांची खाण व्यवसाय सुरू करण्याची मागणी

व्यवसाय बंद असल्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
Goan Demands Mining
Goan Demands MiningDainik Gomantak

Goan Demands Mining: गोव्यातील खाण व्यवसाय काही वर्षांपूर्वी खूप मोठ्या प्रमाणात सुरू होता. पण केंद्रीय पर्यावरण विभागाच्या नियमाप्रमाणे दरवर्षी खाण व्यवसायाच्या परवान्याचे नविनीकरण करणे गरजेचे असते. पण गोव्यातील खाण व्यवसायाची (Goa Mining Industry) मुदत संपूनही परवान्याचे नविनीकरण न झाल्याने आणि या एकंदरीत व्यवसायात भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आल्याने 2012 च्या निवडणुकीनंतर (Goa Elections) गोव्यातील हा खाण व्यवसाय बंद (Goa Mining Ban) पडला आहे. (Goa Mining Latest News Updates)

Goan Demands Mining
मुरगाव नगरपालिकेच्या अर्धवटपणामुळे पार्किंग व्यवस्थेचे वाजले तीन-तेरा

यामध्ये 35 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे म्हटले जात होते. पुन्हा 35 हजार नव्हे तर 3 हजार 500 कोटींचा घोटाळा म्हटले जाऊ लागले. यातील नेमके सत्य काय ही अद्याप जनतेला माहीत नाही. यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गोव्यात 'खनिज महामंडळ' स्थापन करण्यात आले होते. त्यासंदर्भातल्या कामकाज नियमांचा मसुदाही कायदा खात्याकडे पुढील निर्णयासाठी पाठवण्यात आला होता. शिवाय गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनीही खाण व्यवसाय लवकरच सुरू करणार असल्याचे म्हटले होते. परंतु अद्याप गोव्यातील खाण व्यवसाय बंदच आहे. हा व्यवसाय बंद असल्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

खाण व्यवसाय बंद असल्यामुळे होणारे नुकसान

गोव्यात खाण व्यवसायावर अनेक रोजंदारीवर काम करणारे, ट्रक-ट्रॅक्टर चालक, पंक्चरवाले, स्पेअर पार्ट वाले असे कितीतरी लोक अवलंबून आहेत. आणि हा संपूर्ण व्यवसायच ठप्प असल्याने या सगळ्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असूनही, सरकारने अद्याप यावर कोणताच निर्णय दिलेला नाही. गोव्यातील खाणींचा लवकरच लिलाव करून व्यवसाय सुरू करण्याचे सरकारचे प्रयोजन होते. पण केंद्रीय पर्यावरण विभाग, खाण व्यवसायातील भ्रष्टाचार आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशमध्येच सरकार इतके गुरफटून गेले आहे की आता गोव्यातील या खाणी सुरू करणे ही खूप मोठी आणि कठीण गोष्ट बनली आहे.

Goan Demands Mining
ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी आणि ब्रह्मानंद शंखवाळकर यांचा गोवा राजभवनात गौरव

गोवेकरांकडून खाण व्यवसाय सुरू करण्याची मागणी

सरकारच्या समन्वयाच्या कमतरतेमुळे मागील अनेक वर्षांपासून गोव्यातील हा व्यवसाय ठप्पच आहे. खाण कामगारांसाठी आणि या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सर्व लहान-मोठ्या उद्योगांसाठी गोव्यातील खाणी सुरू व्हाव्यात, यासाठी आजवर अनेक आंदोलने झालीत. अनेक संघटनांनीही यासाठी प्रयत्न केले. याच पार्श्वभूमीवर गोव्यात सध्या सोशल मीडियावर #GoanDemandsMining हा हॅशटॅग सर्वत्र व्हायरल होत आहे. या हॅशटॅगमार्फत गोव्यातील जनता खाण व्यवसाय परत सुरू करण्याची मागणी करत आहे.

यामध्ये खालील गोष्टी जनतेमार्फत सोशल मीडियावर मांडल्या जात आहेत.

1. खाणबंदीमुळे सुमारे 3 लाखांहून लोक त्रस्त आहेत. खाणींवरील बंदी उठवून आमचे दुःख संपवा!

3. खनिज निर्यात संघटना (Goa Mineral Ore Exporters Association) या गोव्याच्या खनिज निर्यात व्यापाराला प्रोत्साहन, पाठिंबा, संरक्षण आणि वृद्धिंगत करण्या (GMOEA) ने 2018 मध्ये राज्य सरकारला पत्र लिहून नमूद केले होते की खाणबंदीमुळे राज्याच्या महसुलात 34 दशलक्ष रुपयांचे नुकसान होईल आणि हजारो लोकांच्या रोजीरोटीवर परिणाम होईल.

3. गोव्यात अच्छे दिन कधी येणार? आम्हाला पूर्ण पाठिंबा हवा आहे.

4. खाण मालमत्ता ही गोव्यासाठी मूलभूत संपत्ती आहे. त्याशिवाय काहीच नाही. आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे.

5. गोव्यात लोक धमाल करायला जातात. पण दुसरीकडे गोवा सोडून गोवावासी कामाच्या शोधात जात आहेत. कृपया सरकारने हा खाणप्रश्न सोडवावा.. ही आमची विनंती आहे.

6. गोव्यात खाणकाम पुन्हा सुरू झाले नाही तर गोव्याची लवकरच पडझड होईल, यात शंका नाही

7. जीवन जगण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे सरकारने खाण व्यवसाय सुरू करून मार्ग मोकळा करावा.

8. आम्हाला रोजगार द्या. गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यातील खाण कामगार अडचणीत आहेत.

यावर सरकारची पुढील भूमिका ही या सर्व प्रकाराला वळण लावणारी ठरणार आहे. सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे गोवेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com