Fifa World Cup 2022 : कतारमध्ये स्थायिक गोमंतकीय मुलीचं फिफासाठी खास थीम साँग

कतारमध्ये स्थायिक असलेल्या भारतीय वंशाच्या क्लोई बोवार्ड या 10 वर्षीय मुलीनं फिफा विश्वचषकासाठी 'हय्या हय्या' हे गाणं कतारमधील सर्व कामगार आणि नेत्यांना समर्पित केलं आहे.
Fifa World Cup 2022 | Goan Girl Theme Song
Fifa World Cup 2022 | Goan Girl Theme Song Dainik Gomantak

Fifa World Cup 2022 : कतारमध्ये स्थायिक असलेल्या भारतीय वंशाच्या क्लोई बोवार्ड या 10 वर्षीय मुलीनं फिफा विश्वचषकासाठी 'हय्या हय्या' हे गाणं कतारमधील सर्व कामगार आणि नेत्यांना समर्पित केलं आहे. या गाण्याचं चित्रिकरण कतारमध्येच विविध ठिकाणांवर करण्यात आलं आहे. या गाण्यातही स्थानिक कलाकारांनाच प्राधान्य देण्यात आलंय. यात कामगारांसह स्थानिक फुटबॉलपटू आणि संगीत क्षेत्रातील कलाकांरांना दाखवण्यात आलं आहे ज्यातून कामगारांच्या वेदनाही चित्रित करण्याचा प्रयत्न या मुलीने केला आहे. यात एका शाळकरी विद्यार्थ्याचा प्रवासही दाखवला गेलाय जो प्रसिद्ध माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचा चाहता आहे.

Fifa World Cup 2022 | Goan Girl Theme Song
Goa Sports : फोंड्यातील जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षकाच्या मेहनतीस राष्ट्रीय स्तरावर बक्षिसी

कतारमधील या मुलीने केलेला हा व्हिडीओ बनवण्यास 2 सप्टेंबरपासून सुरुवात केली होती. सहावीत शिकणाऱ्या या मुलीचं मुंबईसह गोव्याशीही फार जवळचं नातं आहे. एका संगीताशीच निगडित कुटुंबाशी या मुलीचा संबंध असल्याचीही माहिती आहेत. या मुलीचे वडिल ख्रिस्तोफर हे अँग्लो इंडियन कुटुंबातील असून त्यांचं मूळ मुंबईतलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते स्वत:ही एक उत्तम गायक, गिटारवादक आणि ड्रम प्लेअर असून बँड बूमरसाठी वीकएंडला काम करतात. क्लोईची आई नताशा फर्नांडिस मुंबईत लहानाची मोठी झाली असली तरीही मूळची गोव्यातल्या शिवोलीची आहे. नताशा याही उत्तम गायिका आणि ड्रम प्लेअर आहेत.

हे गाणं 'Everybody Loves Chloe' या क्लोईच्या युट्यूब अकाऊंटवर अपलोड करण्यात आलं आहे. ज्याला चाहत्यांचा आणि फॉलोअर्सचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. आपल्या संगीतमयी प्रवासाबद्दल बोलताना क्लोई म्हणते, वयाच्या दुसऱ्या वर्षापासून गाण्याकडे वळत गेले. इतकंच नाही तर तिसऱ्या वर्षी आपण पियानो वाजवायला सुरुवात केल्याचंही तिने सांगितलंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने गाणं गाण्याचं कोणतही शिक्षण घेतलेलं नाही. मात्र तिच्या आवाजाची जादू आता सर्व चाहत्यांना मात्र भूरळ घालताना दिसते आहे. आपण लवकरच गाण्याचं शिक्षण घेण्यास सुरुवात करणार असल्याचं तिने एका ब्राझीलमधील चाहत्याला उत्तर देताना सांगितलंय.

हा व्हिडीओ दोहा, कतारसारख्या समुद्र किनाऱ्यांवर तसंच काही वाळवंटी प्रदेशातही शूट करण्यात आलाय. क्लोईने वाळवंटी भागातील शूटसाठी पहाटे 3 वाजता उठत आपलं कामाप्रती असलेलं प्रेमही दाखवलंय. पहाटे 3 वाजता उठणं कठीण होतं, मात्र हा व्हिडीओ कधी एकदा पूर्ण करतोय याची उत्सुकता लागल्याने सर्व त्रासाचा विसर पडल्याचंही क्लोई सांगते. या सर्व गोष्टींमधून तयार झालेलं गाणं पाहणं हे मोठं समाधानाचं असल्याची भावनाही तिने व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रवासात सोबत राहिलेल्या कुटुंबाचं, मित्र परिवाराचं आणि चाहत्यांचंही तिने अभिनंदन करत त्या सर्वांचे आभार मानले आहेत.

कतार हे नेहमीच कुटुंब, खेळ आणि क्रीडाप्रेमींसाठी हक्काचं ठिकाण आहे. याठिकाणी सर्वच प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे तुम्हीही कतारमध्ये येऊन तुमच्या आवडत्या टीमला सपोर्ट करा, असं आवाहनच क्लोईने केलं आहे. यासोबतच तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा आणि त्यांच्या संस्कृतीचा आदरही करण्याचा सल्ला तिने दिलाय. क्लोई स्वत: जिम्नॅस्टिक्स, बास्केटबॉल, नेटबॉल आणि अॅथलेटिक्समध्ये सक्रीय आहे. येत्या फिफा विश्वचषकामध्ये ती तिच्या आवडत्या ब्राझीलच्या संघाला सपोर्ट करणार आहे. मात्र दुसरीकडे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनल मेसी यांच्या कारकीर्दीतील हा शेवटचा फिफा असण्याची शक्यता असल्याने क्लोई त्यांचा खेळ पाहण्यासही उत्सुक आहे. जिथे क्लोई ब्राझीलच्या संघाला सपोर्ट करणार आहे, तिथे तिचे बाबा मात्र इंग्लडचे फॅन असून त्या संघाला चीअर करण्यासाठी अंतिम सामन्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com