गोव्यातील लोकांमध्ये भाजप सरकारबद्दल असंतोष: प्रसाद गावकर

लोकांना काँग्रेस सरकारच हवे अशी भावना झाल्याचे मत प्रसाद गावकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर व्यक्त केले.
Prasad Gaonkar
Prasad GaonkarDainik Gomantak

पणजी: माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मी अपक्ष आमदाराचा पाठिंबा दिला होता. सर्वांना एकत्रित पुढे घेऊन जाण्याच्या त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे मी पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांच्या आजारानंतर भाजपमध्ये पक्षाच्या नेत्यांकडून आमदारांना वागणूक देण्यात बऱ्याच गोष्टी खटकल्या. त्यामुळे हा पाठिंबा मी काढून घेतला व विरोधकांसमवेत विधानसभेत राहिलो, असे प्रसाद गावकर (Prasad Gaonkar) यांनी काॅंग्रेस प्रवेशानंतर सांगितले. (Goan people are discontented with BJP Government)

Prasad Gaonkar
गोव्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

गोव्यातील (Goa) लोकांनी गेल्या दहा वर्षातील भाजप सरकारची राजवट पाहिली आहे. गोमंतकियांत त्यांच्या या कार्यपद्धतीबाबत असंतोष आहे. सांगे मतदारसंघामधून राज्याला खाण व्यवसायामुळे सर्वाधिक महसूल मिळायचा तरीही सरकारने या मतदारसंघाकडे विकासाच्या दृष्टीने दुर्लक्ष केले. मतदारांना पुन्हा भाजप (BJP) सत्तेवर आलेले नको आहे, काँग्रेस सरकारच हवे अशी भावना झाल्याचे मत प्रसाद गावकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर व्यक्त केले.

गेली पाच वर्षे मी भाजप सरकारची सत्ताधारी कारकिर्द व त्यानंतर विरोधकामध्ये राहून अनुभव घेतला आहे. सांगे मतदारसंघाच्या अनेक समस्या धसास लावण्यासाठी काँग्रेस सरकार सत्तेवर यायला हवे त्यासाठी या पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रवेश करण्याचा निश्‍चय केला असल्याचे प्रसाद गावकर यांनी सांगितले होते.

Prasad Gaonkar
'काँग्रेसची मते फोडण्यासाठी भाजपने गोव्यात तृणमूल काँग्रेस व ‘आप’ला आणले'

दक्षिणेला सांगेचे पाणी तरीही दुर्लक्षच

सांगे (Sanguem) मतदारसंघातून मी अपक्ष निवडून येण्यापूर्वी सुमारे 20 वर्षे भाजप व मगोचे आमदार होऊन गेले. सांगेत खाण व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असताना सरकारला महसूल मिळत होता. सांगेतूनच दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणारे साळावली धरण आहे. या बदल्यात सरकारने या मतदारसंघासाठी काहीच केले नाही, असा आरोप प्रसाद गावकर यांनी केला.

कॉंग्रेस काळात लोक होते सुखी

2007 ते 2012 या काळात काँग्रेस सरकार असताना या मतदारसंघातील लोक सुखी होते. मात्र, त्यानंतर गेली दहा वर्षे अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे भाजपबाबत लोकांमध्ये रोष आहे, असे प्रसाद गावकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com