Amey Chodankar : गोव्याचा अमेय ठरलाय क्रिएटिव्ह डायरेक्टर ऑफ द इयर

अत्युच्च पातळीवरील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गोव्याच्या अमेय चोडणकर यांना यावर्षीचा ‘उत्कृष्ट क्रिएटिव्ह डायरेक्टर’ हा बहुमान प्राप्त झाला आहे.
Amey Chodankar
Amey ChodankarDainik Gomantak

Amey Chodankar : कान्स लायन्स क्रिएटिव्हिटी रिपोर्टमध्ये जगातील सर्वात सर्जनशील व्यक्तींचा आणि व्यवसायांचा समावेश केला जातो. व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा आणि प्रेरणांचा केलेला सर्जनशील वापर हा त्यासाठी प्रमाण मानला जातो. ‘कान्स लायन्स फेस्टिव्हल आॅफ क्रिएटिव्हिटी’ने त्यांचा क्रिएटिव्हिटी रिपोर्ट हल्लीच घोषित केला. 2022 या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणारे जगातले दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि कॉपी रायटर यांचा समावेश या क्रिएटिव्हिटी रिपोर्टमध्ये होता. या अत्युच्च पातळीवरील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गोव्याच्या अमेय चोडणकर यांना यावर्षीचा ‘उत्कृष्ट क्रिएटिव्ह डायरेक्टर’ हा बहुमान प्राप्त झाला आहे.

अमेय चोडणकर सध्या बेंगलोर येथील ‘डेंटसू क्रिएटिव्ह’ या आस्थापनात क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पहात आहेत. क्रिएटिव्ह डायरेक्टर या नात्याने विविध ब्रॅण्डसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या डिजिटल, मेनलाईन आणि ब्रॅण्ड डिझायनवर देखरेख ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. या आस्थापनाच्या इतरही काही महत्त्वपूर्ण आणि पुरस्कार विजेत्या कॅम्पेनिंगमध्ये त्यांनी क्रिएटिव्ह डायरेक्टर या नात्याने आपल्या संघाचे नेतृत्व केले आहे. स्विगी इन्स्टामार्टचे ‘द बेटर हाफ कुकबुक’, ‘फ्लिपकार्ट हॅगलबोट’, ‘स्विगी व्हॉईस आॅफ हंगर’, मॅक्स फॅशनचे ‘बहन कुछ भी पहन’, ‘उबर जर्सी नॉज नो जेंडर’, ‘उबर आयसीसी वर्ल्ड कप’, ‘उबर लिव्ह युवर कार बिहायंड’ या गाजलेल्या जाहिरात मोहिमांचे ते क्रिएटिव्ह डायरेक्टर होते. त्याव्यतिरिक्त त्यांच्या संकल्पनांद्वारे गुगल प्ले, आयटीसी केक, ओके क्युपिड, फेसबुक, इकिआ, ब्रिटानिया टाईमपास, वीवर्क, ॲथर एनर्जी या कंपन्यांची कामेही यशस्वीरित्या मिळवली आहेत.

Amey Chodankar
Yuvraj Singh च्या गोव्यातील घरात राहायची संधी; भाडं ऐकून व्हाल थक्क

फाईन आर्टचा पदवीधर असलेल्या अमेयने कलाक्षेत्रात यापूर्वीही अनेक मानसन्मान मिळवले आहेत. डिजिटल माध्यमातून ठाशीव आणि अर्थपूर्ण निर्मिती करणे ही अमेयची खासियत आहे. सर्जनशील कला दिग्दर्शन, ऑनलाईन अणि ऑफलाईन डिझायनर पथकांचे नेतृत्व करण्याचा त्याचा 16 वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या यशाबद्दल बोलताना अमेय म्हणाला, ‘क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून, लायन्सने बहाल केलेल्या जगातील प्रथम स्थानाबद्दल मला खूप आनंद होत आहे. क्रिएटिव्ह रिपोर्ट 2022 आणि वन शो 2022 यांनी केलेल्या माझ्या सन्मानात माझ्या एजन्सीमधल्या टिमचाही खचितच वाटा आहे. आपल्या सामर्थ्याशी प्रामाणिक असण्यावर आणि ते परस्पर संवादाचे माध्यम म्हणून वापरण्यावर माझा विश्वास आहे.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com