गोव्यातील तरुणाचा लंडनमध्ये अपघाती मृत्यू ; केन्सिंग्टन हाय स्ट्रीटवर झाला अपघात

तरूणाच्या अपघाती मृत्यूने यूकेमधील त्याच्या मित्रवर्ग, कुटूंबीय व चांदोर गावातील लोकांना धक्का बसला आहे.
London’s Kensington High Street
London’s Kensington High StreetGomantak

गोव्यातील तरुणाचा लंडनमध्ये अपघाती मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात लंडनच्या गजबजलेल्या केन्सिंग्टन हाय स्ट्रीटवर झालेल्या कार अपघातात युवक जागीच ठार झाला.

निक्सन डी’कोस्टा (वय 27, रा. चांदोर, सासष्टी) असे या तरूणाचे नाव आहे. तरूणाच्या अपघाती मृत्यूने यूकेमधील त्याच्या मित्रवर्ग, कुटूंबीय व चांदोर गावातील लोकांना धक्का बसला आहे.

केन्सिंग्टन हाय स्ट्रीट ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिली. या अपघातात निक्सन डी’कोस्टा याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर पॅरामेडिकल कर्मचारी घटनास्थळी झाले पण, तरूण जागीच मरण पावला. 23 फेब्रुवारी रोजी रात्री 8.20 वाजता हा अपघात झाला.

केन्सिंग्टन हाय स्ट्रीटवर झाल्याने डिकोस्टा यांच्या अपघाताची बातमी लंडनमध्ये देखील वाऱ्यासारखी पसरली. “डिकोस्टा यांचे पार्थिव येत्या काही दिवसांत गोव्यात आणले जाईल आणि चांदोर येथे त्यांचे दफन केले जाईल,” अशी माहिती समोर येत आहे.

London’s Kensington High Street
Goa Crime News : डॉ. श्रीकांत वेरेकर हत्‍या प्रकरण; लव्ह ट्रॅप, सूड, खून, फाशी, जन्‍मठेप आणि सुटकेची कहाणी

यूकेमध्ये प्रकाशित झालेल्या विविध बातम्यानुसार, याप्रकरणी 25 वर्षीय कार चालकाला ताबडतोब अटक करण्यात आली. चालक काही पदार्थाच्या प्रभावाखाली गाडी चालवत असल्याचे आढळून आले आहे.

डी’कोस्टाने अलीकडेच हॉक्सटन हॉटेल, हॉलबर्न येथील नाईट मॅनेजर म्हणून नोकरी सोडली होती. त्यापूर्वी त्याने हार्ड रॉक हॉटेलमध्ये काम केले होते. डी'कोस्टा त्याच्या मित्रांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होता.

रॉयल गार्डन हॉटेलजवळील झेब्रा क्रॉसिंगवर मोठ्या संख्येने लोक जमा होऊन त्यांनी शोक व्यक्त केला. लोकांनी अपघातस्थळी फुले टाकून श्रद्धांजली अर्पण केली. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला मदत म्हणून ऑनलाइन निधी उभारणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com