"गोवा जिल्हा पंचायत निवडणुका भाजप आणि काँग्रेस यांना धडा शिकवण्यासाठीच"

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

गोवा हे सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या श्रीमंत राज्य असूनही दुर्दैवाने काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या चुकीच्या कारभारामुळे राज्याची अधोगती झाली आहे.

पणजी: गोवा हे सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या श्रीमंत राज्य असूनही दुर्दैवाने काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या चुकीच्या कारभारामुळे राज्याची अधोगती झाली आहे. जिल्हा पंचायत निवडणुका या भाजप आणि काँग्रेस यांना धडा शिकवण्यासाठी गोमंतकीयांना संधी आहे आणि त्यांनी ती घ्यावी, असे आवाहन आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी केले.

आणखी वाचा:

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे गोव्यात मतदान केंद्राबाहेर रांगा -

त्यांनी नमूद केले आहे, की गोव्यात दिल्लीतील हायकमांडची सत्ता नको, तर गोमंतकीयांची सत्ता हवी आहे. कामगार कल्याण घोटाळा अद्याप जनतेच्या विस्मृतीत गेलेला नाही. सत्ताधाऱ्यांनी जनतेकडे पुर्ण दुर्लक्ष केले असून केवळ भांडवलदारांना मदत करणारे प्रकल्‍प पुढे रेटण्यातच सरकारला रस आहे. त्यासाठी जनभावनांची कदरही केली जात नाही. गैरव्यवस्थापनामुळे राज्यभरात कोविडचा फैलाव झाला आणि आजवर सातशेहून अधिक जणांनी कोविडमुळे जीव गमावला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भिण्याची गरज नाही हे वाक्य हास्यास्पद ठरले आहे. यंत्रणेत बदल हवा असे जनतेला वाटत असेल तर त्यांनी या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि विरोधी कॉंग्रेसला धडा शिकवावा.

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप आघाडी घेईल -

संबंधित बातम्या