Maddi Tree Goa: गोव्यात 450 वर्षे जुन्या पोर्तुगिजकालिन गोरखचिंच झाडाची चर्चा, राज्यपालानीही दिली भेट

यावेळी ‘गोरख चिंच’ झाडाला येणाऱ्या फळातील बिया राज्यपालांना खाण्यासाठी देण्यात आल्या.
450 Years Old Maddi 
Tree In Goa
450 Years Old Maddi Tree In GoaDainik Gomantak

450 Years Old Maddi Tree In Goa: राज्यात काही ठिकाणी शेकडो वर्षांपूर्वीची झाडे असून त्यांचा सांभाळ करणे अत्यंत गरजेचे असल्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. सोमवारी (ता.13) त्यांनी केपे येथे भेट देऊन पोर्तुगीज काळापासून असलेल्या ‘गोरख चिंच’ झाडाची पाहणी केली.

दरम्यान, राज्यपालांनी भेट दिल्यानंतर गोव्यातील 450 वर्षे जुन्या पोर्तुगिजकालिन गोरखचिंच झाडाची चर्चा सर्वत्र होत आहे.

यावेळी केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, नगरसेवक अमोल काणेकर, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई व इतर मान्यवर उपस्थित होते. दुपारी 01 वा. राज्यपाल पिल्लई यांनी खास ‘गोरख चिंच’ झाडाची पाहणी करण्यासाठी केपेला भेट दिल्याचे सांगितले.

यावेळी ‘गोरख चिंच’ झाडाला येणाऱ्या फळातील बिया राज्यपालांना खाण्यासाठी देण्यात आल्या. या झाडाची नीट काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी कृषी खात्याला दिले आहेत. यावेळी त्यांनी केपे येथील लक्ष्मी मंदिर, मुदेश्वर मंदिर तसेच सेंट फ्रान्सिस खुरसाला भेट दिली. श्री लक्ष्मी व मुदेश्वर मंदिराच्या समितीतर्फे राज्यपालांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

450 Years Old Maddi 
Tree In Goa
Pernem Accident: रस्ता क्रॉस करताना भरधाव ट्रकची धडक, पेडणेतील युवक जागीच ठार

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी राज्यपालांचे भेटीचे फोटो ट्विटवर शेअर केले आहेत. (450 Years Old Maddi Tree In Goa)

गोवा पर्यटनस्थळ म्हणून जगात प्रसिद्ध आहे. राज्यात येणारे पर्यटक फक्त समुद्र व इतर ठिकाणी न जाता त्यांना अशी झाडे येथे असल्याचे सांगितल्यास ही झाडे पाहण्यासाठी ते मुद्दामहून येतील व यातून ग्रामीण भागातही पर्यटन व्यवसाय सुरू होऊ शकतो. असे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com