Para Athlete Sakshi Kale: गोव्याच्या पॅरा ॲथलिट साक्षीने पटकावले आंतरराष्ट्रीय पदक

दमदार धाव; बंगळूरमधील स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत जिंकले रौप्यपदक
Goa;s Para Athlete Sakshi Kale
Goa;s Para Athlete Sakshi KaleDainik Gomantak

Goa;s Para Athlete Sakshi Kale: गोव्याची प्रतिभाशाली पॅरा अॅथलिट साक्षी काळे हिने बंगळूर येथे झालेल्या पाचव्या इंडियन ओपन पॅरा अॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तिचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक ठरले.

साक्षी हिने महिलांच्या 100 मीटर शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावला. ``मी या स्पर्धेत एकूण तीन प्रकारात सहभागी झाले होते. 100 मीटरमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर गतवर्षी जूनमध्ये झालेल्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले. त्याचा परिणाम लांबउडी आणि 200 मीटर शर्यतीतील कामगिरीवर झाला,`` असे मंगळवारी गोव्यात परतलेल्या साक्षीने स्पर्धेतील कामगिरीविषयी सांगितले. कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला.

Goa;s Para Athlete Sakshi Kale
Atal Setu: रेन्ट बाईक, अटल सेतूवर रॉंग साईडने पर्यटक सुसाट; अखेर पोलिसांशी झाला सामना

तिस्क-उसगाव येथील साक्षी 18 वर्षांची असून या वर्षी बारावीची परीक्षा दिली. बंगळूरमधील स्पर्धेसाठी तयारी आणि सहभागासाठी प्रशिक्षक संदीप नाईक, गोव्यातील दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर आणि हितचिंतकांचे भरीव प्रोत्साहन मिळाल्याचे तिने नमूद केले.

दृष्टिदोषांच्या टी-12 गटात सहभाग

बंगळूर येथे 4 ते 7 मे या कालावधीत इंडियन ओपन पॅरा अॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली. साक्षी दृष्टिदोष अॅथलिट्सच्या टी-12 गटात सहभागी झाली होती. या स्पर्धेत भारतासह 11 देशांतील क्रीडापटू सहभागी झाले होते. स्पर्धा भारतीय पॅरालिंपिक समितीतर्फे जागतिक पॅरा अॅथलेटिक्सच्या मान्यतेने, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने बंगळूरच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर घेण्यात आली.

जिगरबाज कामगिरी

गतवर्षी जूनमध्ये उसगाव येथे मुलांसमवेत फुटबॉल खेळत असताना साक्षीच्या गुडघ्यास दुखापत झाली. त्यानंतर ऑगस्टमध्ये शस्त्रक्रिया करावी लागली. साडेचार महिन्यानंतर तिने अॅथलेटिक ट्रॅकवर पुनरागमन केले. या वर्षी जानेवारीअखेरीस गुजरातमधील नादियाड येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. त्यापूर्वी गतवर्षी ओडिशातील भुवनेश्वर येथे तिने राष्ट्रीय सीनियर पॅरा अॅथलिट स्पर्धेत लांबउडीत सुवर्ण, तर 200 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते.

``बंगळूरमध्ये 100 मीटरनंतर लांबउडी आणि 200 मीटरमध्ये पदकाची अपेक्षा होती, पण लांबउडी स्पर्धेपूर्वी शस्त्रक्रिया झालेला गुडघा दुखावला आणि एकाच पदकाचे समाधान लाभले. पुन्हा मैदानात उतरण्यापूर्वी आता वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.``

-साक्षी काळे, गोव्याची पॅरा अॅथलिट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com