Goa's soil for Sansad Bhavan: गोव्याची संस्कृती पोचवूया संसद भवनात

मुख्यमंत्री प्रमोद सावंत : संसद भवनासाठी पाठविण्यात येणाऱ्या मातीचे पूजन
Pramod Sawant
Pramod Sawant Dainik Gomantak

पणजी : इंग्रजांच्या काळात शंभर वर्षांपूर्वी बांधलेले संसद भवन (Sansad Bhavan) आजच्या नवतंत्रज्ञानाच्या युगात पुढे जात असताना आम्हाला नवीन संसद भवनाची गरज होती. पुढच्या 150 वर्षांसाठी ज्या प्रकारचे संसद भवन आम्हाला हवे होते, त्याची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या कार्यकाळात झाली हे आम्ही पाहिले. या संसद भवनासाठी गोव्याची माती पाठविण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी सांगितले.

या मातीच्या स्वरूपात गोव्याची भूमी, येथील संस्कृती संसद भवनात सातत्याने राहील. याच संसद भवनासाठी जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांतून तेथील माती संसद भवनासाठी पोहोचावी. कारण हा देश विविधतेने आणि एकतेने नटलेला आहे, असेही ते म्हणाले.

कला व संस्कृती संचालनालयाच्यावतीने आयोजित संसद भवनासाठी गोव्यातील माती पाठविली जाणार आहे, त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महापौर रोहीत मोन्सेरात, संचालक सगुण वेळीप उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले, की ‘सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं झुकने दुंगा’ हे घोषवाक्य पंतप्रधानांनी 2014 साली दिले आणि जनतेने देशाचे संरक्षण करण्यासाठी त्यांना निवडून दिले. त्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून अभूतपूर्व कार्य होत आहे. स्वतत्वावर आधारीत आणि या देशाला स्वतत्त्वावर पुढे आणण्यासाठी, या देशाला विश्‍वगुरू करण्यासाठी पंतप्रधानांनी वेगवेगळ्या योजना अमलात आणल्या. स्किल इंडियापासून स्टार्ट अप इंडियापर्यंत सर्व योजना अंत्योदय तत्त्वावर राबविल्या. महात्मा गांधीजींनंतर रस्त्यावर झाडू घेऊन जर कोणी उतरले असेल, तर ते पंतप्रधान मोदी.

कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे म्हणाले, आम्ही सर्वजण दिल्लीत जाऊ शकत नाही. मात्र, गोव्याचे सुवर्णमय मातीचे येथे पूजन होत आहे. आज ज्या संसद भवनाची पायाभरणी होणार आहे, तेथे आपणही कधी तरी पोहोचेन अशी आकांक्षा गोव्याच्या तरुणाईला असायला हवी.

मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, आमचा देश विविधतेने नटलेला आहे, प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते. मात्र, ज्यावेळी आम्ही एकत्र येतो त्यावेळी आम्ही देश प्रथम मानतो. या संकल्पनेने आम्ही भारतवासी जोडलेलो आहोत. नवीन संसद भवन हा आमचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. या कार्यक्रमात भूमीपूजनाचे पौरोहित्य योगेश जोशी व किशोर भावे यांनी केले .

नवीन संसद भवनासाठी पाठविल्या जाणाऱ्या गोव्यातील मातीच्या भूमीपूजन कार्यक्रमाला सत्ताधारी पक्षातील मंत्री, आमदार तसेच मगोचे आमदार जीत आरोलकर व अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड उपस्थित होते. या कार्यक्रमाला मंत्री नीळकंठ हळर्णकर, नीलेश काब्राल, सुभाष फळदेसाई, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, गणेश गावकर, जेनिफर मोन्सेरात, प्रविण आर्लेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, सुलक्षणा सावंत व मान्यवर उपस्थित होते.

Pramod Sawant
Goa : वनिकरण आराखडाच रद्द!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com