लॉकडाऊनमुळे गोव्यातील पर्यटन व्यवसाय अडचणीत; 'ही' आहेत कारणे

goa  torisum.jpg
goa torisum.jpg

पणजी : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी असल्याने राज्य सरकारने गेल्या आठवड्यात संचारबंदी आणि आता लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सायंकाळी 5 वाजल्यापासून हे लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होणार आहे.  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूकसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर उद्योगधंदे मात्र चालू राहणार असल्याची माहिती प्रमोद सावंत यांनी दिली आहे.  लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. किराणामालाची सर्व दुकाने दिवसभर खुली राहणार आहेत. कसिनो, बार बंद राहतील. असेही प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.  (Goa's tourism business in trouble due to lockdown; These are the reasons) 

मात्र या लॉकडाऊनचा राज्यातील पर्यटन व्यवसायावर प्रचंड परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.  पर्यटन व्यवसायाचा गोव्याच्या अर्थव्यवस्थेत खूप मोठा वाटा आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात  पर्यटन व्यवसाय चांगलाच अडचणीत आला आहे. वैलांकणी ऑटो हिरेसचे जॉन एफ यांनी याबाबत माहिती दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. संचारबंदी, लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय, समुद्रकिनारे, कासिनो-बार, हे सर्व बंद राहणार आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय विमानउड्डाणावरदेखील बंदी घालण्यात आली आहे.   गोव्यात एकूण 3500 हॉटेल्स पैकी 2100  हॉटेलसनी आपले दरवाजे बंद केले आहेत. तर पंचतारांकित हॉटेल्सनी जवळपास 40-50% आपले दर कमी केले आहेत. त्यामुळे राज्यातील  व्यापारात यंदा मार्च महिन्यात 80 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.  कर्नाटक, महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमध्ये लावण्यात आलेले लॉकडाऊन, याशिवाय राज्यांतर्गत विमान प्रवास आणि आंतरराष्ट्रीय विमानप्रवासांवर असलेली बंदी यासर्वांचा गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. 


पर्यटक नसल्यामुळे राज्यातील दुचाकी आणि चार चाकी वाहने भाड्याने देणाऱ्या कंपन्यांवरच्या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे.  बोट व्यवसाय, कसिनो-बार व्यवसाय, किनारपट्टीवरील व्यापारी  अडचणीत आले आहेत. याचबरोबर, पर्यटनासाठी, कामानिमित्त बंगले, फ्लॅट्स भाड्याने घेण्यासाठी अनेकलोकांचे फोन येत असतात. मात्र लॉकडाऊन मुळे गेल्या काही दिवसांपासून फोन येणेही बंद झाले आहेत. अशी खंत होम्स अँड इस्टेट कन्सल्टन्सी सर्व्हिसचे मॅनेजिंग पार्टनर संदीप नाईक यांनी म्हटले आहे.   दारम्यान, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांचे चित्रीकरणामुळे  हॉस्पिटॅलिटी उद्योगाला काही प्रमाणात मदत मिंट आहे.  मनोरंजन विश्वाससाठी गोवा हे काही नवीन राज्य नाही, मातीर साथीच्या रोगाने राज्याच्या पर्यटन व्यवसायावर चांगलीच कुऱ्हाड कोसळली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com