गोव्यातील भरवशाचे पर्यटनक्षेत्र कोलमडले..!

दैनिक गोमंतक
बुधवार, 9 जून 2021

देशी पर्यटक आले तरी पुरे; सरकारने भूमिका फिरवली

पणजी: गोवा खाण महामंडळ (Mining Corporation of goa) स्थापन सुरू होण्याचे घोडे सरकारी लाल फितीत अडकल्याने खाणी कधी सुरू होतील याचे उत्तर मिळत नाही. असे असताना आता भरवश्याचे असलेले पर्यटन क्षेत्र (Tourism area) कोलमडले आहे. एकेकाळी सरकार जास्त पैसे खर्च करणाऱ्या विदेशी पर्यटकांवर (Tourists) नजर लावून बसले होते आता किमान देशी पर्यटक आले तरी पुरे, अशी सरकारने आपली भूमिका 360 अंशात फिरवली आहे. (Goas tourist destination collapses)

पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांना राज्यात कोविड प्रसार होत असताना पर्यटन क्षेत्राला टाळेबंदी लागू होऊ नये असे वाटत होते. त्यांचे त्या काळातील ‘शो मस्ट गो ऑन’ हे विधान समाजमाध्यमांवर बरेच गाजले होते. त्याचकाळात सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेले पर्यटन धोरण याच काळात लागू करण्यात आले. सरकार त्यातून मोठ्या प्रमाणावर खर्च करणाऱ्या विदेशी पर्यटकांकडे डोळे लावून बसल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते. 

CZMP: राष्ट्रीय हरित लवादाने फटकारल्यानंतर यंत्रणा कामाला; उत्तर व दक्षिण गोव्यात एकाच दिवशी जनसुनावणी

आता मात्र पर्यटनमंत्र्यांना लसीकरण केलेले देशी पर्यटक आले तरी चालतील असे वाटू लागले आहे. 9 मेपासून व्यवसाय बंद पडल्याने पर्यटन व्यवसायाचे दुसऱ्यांदा कंबरडे मोडले आहे. त्यातून आता हा व्यवसाय एवढ्या लवकर सावरेल, असे दिसत नाही. 

विदेशातून कधी पर्यटक येऊ शकतील याविषयी अनिश्चिती असल्याने आता सरकारने देशी पर्यटकांवर भर द्यायचा ठरवल्याचे दिसते. त्यासाठी कोविड प्रभाव ओसरल्यानंतर मोठ्या जाहिरातबाजीचे नियोजन करण्यात येत आहे. कारण पर्यटनाचा हरवलेला चेहरा पुन्हा गोव्याला धारण करायचा आहे, असे पर्यटनमंत्री आजगावकर यांनी सांगितले आहे.

टूर ॲण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष नीलेश शाह यांनी सांगितले, की गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी कोविड लागण होऊ नये यासाठी काय केले पाहिजे याची माहिती देणारे फलक, बॅनर जागोजागी लावले पाहिजेत. आम्ही सरकारला निवेदन देऊन वर्ष झाले तरी त्यावर कार्यवाही झालेली नाही.

गोव्यातील ‘त्या’ घरात 60 वर्षानंतर विजेचा प्रकाश!

सरकारने कोविड प्रतिबंधात्मक उपायांच्या अंमलबजावणीची सक्ती केली पाहिजे आणि पर्यटन क्षेत्र खुले केले पाहिजे. पर्यटन व्यवसाय दीर्घ कालावधीसाठी बंद ठेवता येत नाही. कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या पर्यटकांना तरी राज्यात येऊ दिले पाहिजे असे मत पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी सांगितले आहे. 

दोन हजार हॉटेल्स बंद आहेत ती सुरू केली पाहिजे. सीमांवर, रेल्वे स्थानकांवर आणि विमानतळांवर तत्काळ कोविड चाचणीची सोय सरकारने केली पाहिजे असे टीटीएजीचे अध्यक्ष नीलेश शहा यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या